शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

महाराष्ट्रात ३ कोटींवर जन-धन खाती; प्रत्येक खात्यात सरासरी ३२५२ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:18 IST

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची माहिती

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांत आवडत्या आर्थिक योजनांपैकी एक असलेल्या जन-धन योजनेंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ३.०३ कोटींपेक्षा अधिक खाते उघडण्यात आले आहेत. यात ९८५६ कोटींपेक्षा अधिक रक्कम आहे. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले की, राज्यात पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत एकूण ३,०३,०७,१३९ खाते उघडण्यात आले आहेत. २१ जुलैपर्यंत प्रत्येक जन-धन खात्यात सरासरी ३२५२ रुपये याप्रमाणे एकूण ९८५६ कोटी रुपये रक्कम जमा होती. राजन विचारे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. कराड यांनी सांगितले की, सर्व गावांच्या ५ किमीच्या क्षेत्रात बँकिंग सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने जन-धन दर्शक नावाचे एक जीआयएस आधारित ॲप सुरू केले आहे. या ॲपमध्ये ५.५३८ लाख गावांपैकी ५.५३५ लाख गावांतील पाच किमीच्या क्षेत्रातील बँकिंग अकाउंट उपलब्ध आहेत. ठाणे जिल्ह्यात १९ लाखांवर खाते असून यात ६५८ कोटी रुपये आहेत. सरासरी रक्कम ३३१५ आहे. नाशिक जिल्ह्यात १९ लाखांवर खाते आहेत. यात ७६४ कोटी रुपये असून सरासरी ३८६४ रुपये आहेत. पुणे जिल्ह्यात १६ लाख खाते असून ८२८ कोटी रुपये आहेत. सरासरी रक्कम ५११६ आहे. सोलापुरात १४ लाखांवर खाते असून ४५२ कोटी रुपये आहेत. अहमदनगरमध्ये १३ लाखांवर खाते आणि ४७३ कोटी रुपये आहेत. नांदेडात १३ लाखांवर खाते आणि ३३२ कोटी रुपये आहेत. जळगावमध्ये १२ लाखांवर खाते आणि ३२३ कोटी रुपये आहेत. औरंगाबादेत १२ लाखांवर खाते आणि ३३९ कोटी रुपये आहेत. कोल्हापुरात ११ लाखांवर खाते असून ३६० कोटी रुपये आहेत. महाराष्ट्रात एकूण ३ कोटींवर खाते असून ९८५६ कोटी रुपये खात्यात आहेत. याची सरासरी ३२५२ रुपये आहे. सर्वाधिक खाती ९ ठिकाणी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक खाते ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, अहमदनगर, नांदेड, जळगाव, औरंगाबाद आणि कोल्हापूर येथे उघडण्यात आले आहेत. खात्यात जमा रकमेबाबत पुणे, नाशिक, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, बीड, कोल्हापूर आणि औरंगाबाद सर्वांत पुढे आहे, तर सरासरी सर्वांत अधिक रक्कम सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, रायगड, उस्मानाबाद, भंडारा, वर्धा आणि गडचिरोलीच्या जन-धन खात्यात आहे.