ओवे कॅम्प तलावात तरुण बुडाला
By Admin | Updated: July 22, 2016 01:43 IST2016-07-22T01:43:40+5:302016-07-22T01:43:40+5:30
मित्रासह मौज करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खारघरमधील ओवे कॅम्प तलावात बुडून मृत्यू झाला.

ओवे कॅम्प तलावात तरुण बुडाला
पनवेल : मित्रासह मौज करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खारघरमधील ओवे कॅम्प तलावात बुडून मृत्यू झाला. शंकर पटेल (१८) असे या तरु णाचे नाव आहे.
बुधवारी शंकर पटेल मित्रासह ओवे कॅम्पच्या तलावात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याच्या अंदाज न आल्याने तरु णाचा बुडून मृत्यू झाला. यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गुरु वारी सकाळी ९ च्या सुमारास शंकरचा मृतदेह सापडला. गतवर्षी याच तलावात दोन तरुणांनी आपला जीव गमावला होता. (प्रतिनिधी)