या सहा कारणांमुळे जुळतात विवाहबाह्य 'प्रेमसंबंध'

By Admin | Updated: September 14, 2016 13:33 IST2016-09-14T13:33:00+5:302016-09-14T13:33:00+5:30

ज्यांचे लवकर लग्न झाले आहे. म्हणजे ज्यांचा विशीमध्ये विवाह झाला आहे. त्यांच्या आयुष्यात वयाच्या तिशी-पस्तीशीपर्यंत एक स्थैर्य आलेले असते.

Out of the unborn 'love affair' | या सहा कारणांमुळे जुळतात विवाहबाह्य 'प्रेमसंबंध'

या सहा कारणांमुळे जुळतात विवाहबाह्य 'प्रेमसंबंध'

ऑनलाइन लोकमत 
 
या कारणांमुळे विवाहबाह्य संबंध जुळतात. 
 
लवकर लग्न 
ज्यांचे लवकर लग्न झाले आहे. म्हणजे ज्यांचा विशीमध्ये विवाह झाला आहे. त्यांच्या आयुष्यात वयाच्या तिशी-पस्तीशीपर्यंत एक स्थैर्य आलेले असते. आपल्याला आता पूर्वीसारखे आयुष्य जगता येत नाही. आयुष्यातील उत्साह, मजा संपली आहे अशी त्यांची भावना असते असे लोक विवाहबाह्य संबंधांकडे वळतात. 
 
चुकीच्या व्यक्तीबरोबर विवाह 
अनेकजण कुटुंबाच्या, समाजाच्या दबावामुळे लग्न करतात. पूर्णपणे ओळखत नसलेल्या व्यक्तीला आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतात. पण लग्न केल्यानंतर काहीकाळाने आपण चुकीचा निर्णय घेतल्याची त्यांना जाणीव होते. या दरम्यान अशा व्यक्तींच्या संपर्कात त्यांच्या विचारांशी सुसंगत व्यक्ती  आली तर, तो किंवा ती त्या व्यक्तीच्या जवळ जातात. अशा प्रकरणात मैत्रीपासून सुरु झालेल्या नात्याची विवाहबाहय संबंधात अखेर होते. 
 
बदलाशी जुळवून घेण्यात असमर्थता 
आपल्या आयुष्यात रोज बदल घडत असतात. अनेकजण त्या बदलांशी जुळवून घेतात पण काहीवेळा गंभीर आजार, मृत्यू, बेरोजगारी, आर्थिक तंगी अशा समस्या हाताळण्यात अपयश आल्यामुळे तो किंवा ती दुस-या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. 
 
पालकत्व 
लग्नानंतर एक मूल झाल्यावर पती-पत्नीच्या नात्यात बदल होतात. पत्नी एक आई बनलेली असते. ती तिचे जास्तीत जास्त मुलाच्या वाढीवर देते. अशावेळी पतीला आपल्याकडे घरात दुर्लक्ष होतेय अशी भावना वाढीस लागते. त्यातून पुरुष परस्त्रीकडे आकर्षित होतो. स्त्रिया मुलाचा सांभाळ करण्यात इतक्या गुंतून गेलेल्या असतात कि, त्यांना खूप उशिरा याची जाणीव होते. 
 
शरीरसुखात असमाधान 
वैवाहीक जीवनात पत्नी-पत्नीमधील लैंगिक संबंध खूप महत्वाचे असतात. जर लैंगिक संबंध मनासारखे नसतील तर अशा नात्यामध्ये हमखास दुस-या व्यक्तीचा आधार शोधला जातो. 
 
भावनिक दुरावा 
अनेकदा कुटुंब सधन असते. पैशांची कुठलीही अडचण नसते. पण पती-पत्नी भावनिक दुष्टया परस्परांपासून खूप लांब असतात. नात्यामध्ये तो संवाद नसतो त्यावेळी विवाहबाह्य संबंधांची शक्यता जास्त असते. 
 
बदलता प्राधान्यक्रम 
लग्न करणारी जोडपी अनेकदा आयुष्याच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करत नाहीत. बदलत्यावेळेनुसार प्राधान्यक्रम, गरजा बदलत जातात, अधिक स्पष्ट होतात. अशा वेळी विचार पटत नसल्याने खटके उडू लागतात त्यातून नात्यात तिस-या व्यक्तीचा प्रवेश होतो. 
 

Web Title: Out of the unborn 'love affair'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.