जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर

By Admin | Updated: May 24, 2014 01:11 IST2014-05-23T19:10:32+5:302014-05-24T01:11:13+5:30

पिंजर - बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील खूनप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली असून, महादेव रामभाऊ निलखन याचे प्रेत तहसीलदारांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आले. या हत्याकांडातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. महादेव निलखन यांची अनैतिक संबंधातून २२ मे रोजी मंजुळाबाई भगत हिच्या घरातच हत्या करण्यात आली होती.

Out of the graves buried in the soil | जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर

जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर

पिंजर - बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील खूनप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली असून, महादेव रामभाऊ निलखन याचे प्रेत तहसीलदारांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आले. या हत्याकांडातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. महादेव निलखन यांची अनैतिक संबंधातून २२ मे रोजी मंजुळाबाई भगत हिच्या घरातच हत्या करण्यात आली होती. पुरावा नष्ट करण्याचे हेतूने मंजुळाबाईने दोन इसमाच्या मदतीने त्याचा मृतदेह घरातच खोदलेल्या खड्ड्यात पुरला होता. या प्रकाराची भनक गावकर्‍यांना लागताच मंजुळाबाईचा भंडाफोड झाला. पोलिस ताफा गावात धडकल्यानंतर मंजुळाबाईची बोलतीच बंद झाली होती. मात्र पिंजर पोलिसांनी तिला बोलते केले आणि या प्रकरणातील सत्य बाहेर काढले. महादेव निलखन याने आत्महत्या केल्याची माहिती मंजुळाबाईने पोलिसांना दिली; मात्र त्याच्या प्रेताची विल्हेवाट का लावल ? या प्रश्नाने मंजुळाबाईवरील संशय वाढला. खड्डा खोदण्यासाठी मदत करणारे करण शेषराव इंगोले (वय २५) व मिलिंद पांडुरंग मनवर (वय २३) यांनाही पोलिसंानी अटक केली आहे.
संत गाडगेबाबा पथकाची मदत - जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपतकालीन पथकाने विशेष सहकार्य केले. पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, प्रवीण खराटे, उल्हास आटेकर, सतीश ठाकूर, राहुल जवके, नीलेश जवके, नाना धाईत, आशिष गुगळे, पिंटू खराटे, अंकुश धापे, अमोल इंगळे यांनी मदत केली. 

Web Title: Out of the graves buried in the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.