शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे, भाजपमुळे देशाची जगात नामुष्की, उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 08:48 IST

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोले लगावले.

औरंगाबाद : आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो परदेशात कचराकुंडीवर लावला जातो.  भाजपचा टिनपाट प्रवक्ता व भाजपच्या विद्यमान धोरणामुळे देशावर अपमानीत होण्याची वेळ आली, अशी घणाघाती टीका करतानाच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे, असे वक्तव्य औरंगाबादेत बुधवारी झालेल्या जाहीर सभेत केले. 

शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोले लगावले. सत्तेत असूनही हिंदू हित साधले जात नसेल, काश्मीरमधील पंडित काश्मिरात राहू शकत नसतील, त्यांचे दिवसाढवळ्या मुडदे पडताना पाहून ढिम्म बसणारी भाजप नागरिकांना तुम्हाला अपेक्षित होती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, शिवसेनेचे कुणीही अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासाठी आले नव्हते, असे फडणवीस सांगतात. परंतु मी त्यांना आठवण करून  देतो की, याच औरंगाबादेतून शिवसेनेचे तत्कालीन खासदार मोरेश्वर सावे शिवसैनिकांसह अयोध्येला गेले होते. त्यांचे चिरंजीव अतुल सावे सध्या भाजपचे आमदार आहेत. मी या सावेंना विचारतो, अरे फडणवीसांना जाऊन सांगा, माझे बाबा अयोध्येला गेले होते. नसेल गेले तर तसेही सांगा.

ज्यांना शत्रू समजलाे ते मित्र झाले; अन् ३० वर्षांचा मित्र झाला हाडवैरीसध्या गाजणारा हिंदुत्वाचा मुद्दा धरून ते म्हणाले, आमचे हिंदुत्व कसे, हे मोजणारे तुम्ही कोण? ज्यांना आम्ही पंचवीस, तीस वर्ष मित्र म्हणालो, तेच आता हाडवैरी झाले व ज्यांची आम्ही संभावना शत्रू म्हणून केली त्यांनी मैत्रीचा हात पुढे करून उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्याची संधी दिली.भाजपची नाटके केवळ सत्तेसाठी विरोधी पक्षात असताना भाजप हिंदू हिताच्या घोषणा करीत होता. हिंदूंचे सणवार असतानाही महागाईविरुद्ध बंद घडवून आणत होता. आता महागाई प्रचंड वाढली आहे. रुपया दररोज गडगडतो आहे. पेट्रोलचे भाव ६० पैसे वाढले म्हणून बैलगाडीने संसदेत जाणारे अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आम्हाला आता पाहायचा आहे, असे हिणवत ठाकरे म्हणाले, भाजपचे ही सर्व नाटके केवळ सत्तेसाठी होती, हे आता स्पष्ट दिसतेय. 

गुडघे टेकण्याची वेळ का आली?मध्य आशियातील मुस्लीम देशासमोर भारत देशाला गुडघे टेकण्याची वेळ का आली? भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देश अपमानीत झाला.  भाजपचीही वागणूक देशाला, महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे?     - उद्धव ठाकरे

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद