शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

आमचे ७२ तासांत सरकार गेले, अडीच वर्षे मी, अडीच तुम्ही; फडणवीसांनी सांगितली अजित पवारांसोबतची 'डील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 17:03 IST

Devendra Fadanvis on Ajit Pawar: अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यावर फडणवीस यांचे अभिनंदनपर भाषण झाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांची स्तुती केली. तसेच एक योगायोगही गंमतीने सांगितला.

अजित पवार आणि मी अडीच वर्षांपूर्वी ७२ तासांसाठी सत्तेत होतो. आम्ही चांगले मित्र आहोत. अजित पवार जरी शरद पवार यांचे पुतणे असले तरी त्यांनी आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. यामुळे ते तरुणाई, कार्यकर्त्यांच्या पिढीचे ताईत बनले, अशा शब्दांत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची स्तुती केली.

अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यावर फडणवीस यांचे अभिनंदनपर भाषण झाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांची स्तुती केली. तसेच एक योगायोगही गंमतीने सांगितला.अजित पवार आणि मी ७२ तास सरकारमध्ये होतो. जेव्हा सरकार गेले तेव्हा आम्ही दोघांनी ठरविले होते. अडीच वर्षे मी विरोधी पक्षनेता आणि पुढची अडीच वर्षे ते विरोधी पक्ष नेते राहतील, अशा शब्दांत फडणवीसांनी कोपरखळी मारली. तसेच आताही तुमच्या आमदारांना विचारा ते सरकार बरोबर होते, असे ते म्हणत असतील असेही फडणवीस म्हणाले. 

अजित पवार हे चारवेळा उप मुख्यमंत्री होते. पहिल्यांदाच ते विरोधी पक्षनेते पद भूषवत आहेत. विरोधी पक्ष नेत्याने आक्रमकतेने, संयमाने कधी चातुर्याने सरकारवर अंकुश ठेवू शकतो. विरोधी पक्षांना देखील विरोधाची मर्यादा समजायला हवी. विरोधाला विरोध नको, सकारात्मक विचार असले पाहिजेचत. आवश्यक असेल तिथे भूमिकाही घेता आली पाहिजे. राज्याचा हितासाठी दोन पाऊले मागेही घ्यावी लागतात, अजित पवार हे करतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे