आमच्या जिवाला कुटुंबाकडूनच धोका

By Admin | Updated: October 2, 2015 03:55 IST2015-10-02T03:55:16+5:302015-10-02T03:55:31+5:30

आमचे अपहरण झाले नसून घरच्यांनी केलेल्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून आम्ही स्वत:हून घर सोडून मुंबईला आलो

Our family is at risk from the family | आमच्या जिवाला कुटुंबाकडूनच धोका

आमच्या जिवाला कुटुंबाकडूनच धोका

मुंबई : आमचे अपहरण झाले नसून घरच्यांनी केलेल्या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून आम्ही स्वत:हून घर सोडून मुंबईला आलो. आमच्या दोघींच्या जीविताला कुटुंबापासूनच धोका आहे, असे सनातनच्या साधक प्रिया आणि प्रीती चौरसिया यांनी सांगितले. श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आय. जी. खंडेलवाल आणि सनातनचे वकील संजीव पुनाळेकर देखील उपस्थित होते.
माझे अपहरण झाले, ही बातमी वाचून मला खूप दु:ख झाले. यामुळे आम्ही खंडेलवाल आणि पुनाळेकर यांच्या मदतीने जगासमोर येण्याचे ठरवले. पैशांसाठी माझे आई-वडील माझे नाव बदलून कोलकाता येथील उद्योगपतीच्या मुलाशी दुसरे लग्न करण्याची जबरदस्ती केल्यामुळे मी घर सोडण्याचा निर्णय घेतला, असे प्रीती चौरसियाने सांगितले. याच मुलींच्या अपहरणाची माहिती श्याम मानव यांनी दिली होती. प्रियाने त्याचा इन्कार करताना आमच्यांवर कोणत्याही प्रकारचे संमोहन झालेले नाही, असे स्पष्ट केले.
मानव यांचे वय झाले आहे. ते टीआरपीसाठी आमची बदनामी करत आहेत. माझे कुटुंब त्यांच्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे, असा आरोप साधक डॉ. स्वाती यांनी केला.
----------आमची मुलगी ‘सनातन’मध्ये अडकली
महेंद्र कांबळे ल्ल बारामती
गेल्या चार वर्षांपासून मुलगी डोळ्यासमोर नाही. त्यामुळे आम्ही पूर्णपणे खचलो आहोत. आमची मुलगी सुखरूप आमच्या घरी यावी, हीच इच्छा आहे, अशा शब्दांत सनातनची साधक शीतल हिच्या आईवडिलांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
बारामती शहरातील शीतल ३ मार्च २०११ला घरातून बँकेत नोकरीला जाण्यासाठी बाहेर पडली. ती परत आलीच नाही. सनातनच्या आश्रमात ती अगोदर गोव्याला, आता पनवेलला आहे. तिचा फोन येत नाही. आम्ही फोन केला तर ठराविक संवाद साधल्यानंतर फोन बंद होतो. ती सुखरूप घरी यावी, हीच आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले. शीतलचे वडील बेकरीमध्ये काम करतात. आई २० वर्षांपासून घरगुती खानावळ चालवते. त्यांना तीन मुली आहेत. सनातनच्या बारामतीतील केंद्र प्रमुखाकडून ती गोव्याच्या रामनाथी आश्रमात असल्याचे समजले. ७ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास आश्रम गाठला. मात्र मुलीला परत द्या म्हटल्यावर गोव्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात आमच्याच विरुद्ध तक्रार करण्यात आली. सनातनच्या साधकांनी आम्हाला पोलीस कोठडीची हवा खायला लावली, असे तिच्या पालकांनी सांगितले.

Web Title: Our family is at risk from the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.