शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही – अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 18:50 IST

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप  देईन नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भूमच्या जाहीर सभेत सांगितले.

उस्मानाबाद ( भूम ) : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप  देईन नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भूमच्या जाहीर सभेत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेचा आज दुसरा दिवस होता आणि भूम येथे ही जाहीर सभा पार पडली. तुळजापूरच्या आई भवानीचं दर्शन घेवून सुरु झालेली हल्लाबोल यात्रेला पहिल्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला. तसाच दुसऱ्यादिवशीच्या या हल्लाबोल यात्रेला प्रतिसाद मिळाला. या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, रामराव वडकुते, आमदार विदया चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, जीवनराव गोरे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, सुरेखा ठाकरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे,अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफार मलिक आदी उपस्थित होते.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये आम्ही शेतकऱ्यांना ७१ हजार कोटीची कर्जमाफी दिली परंतु या सरकारने अजुनपर्यंत कर्जमाफी दिलेली नाही. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. या सरकारच्या कालावधी पहिल्यांदा शेतकरी संपावर गेला. या सरकारचे प्रतिनिधी कर्जमाफी करण्यासंदर्भात पवार साहेबांचा सल्ला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा असे सांगितले होते. मात्र त्यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल केले आणि त्यानंतर कर्जमाफीची काय अवस्था आहे. सगळाच शेतकरी माझा मग प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव कशासाठी परंतु हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करताना दिसत आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.

आज कुठल्याही निवडणूका आलेल्या नाहीत परंतु आपण एकत्र आलो आहोत. आपला शेतकरी मोडला तर राज्य उध्वस्त होईल. बाजार उध्वस्त होईल आणि आर्थिक कंबरडे मोडून पडेल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचा घाट हे सरकार घालत आहे. कुठे घेवून चाललाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आली आहे.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये भाजप-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढले. शिवसेना पक्ष कसा चुकीच्या पध्दतीने जातोय याचे उदाहरणासह दाखले दिले. आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्दयांना हात घातला आणि ते मुद्दे कशापध्दतीने सोडवले गेले पाहिजे याची गणिते मांडली. शिवाय पत्रकारितेला मॅनेज करण्याची भाषा या सरकारकडून कशी होत आहे त्यामुळे लोकशाहीच्या या घटकाला कशी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे लोकशाही कशी टिकणार, कसा सव्वा कोटीचा देश पुढे जाणार असा सवालही अजित पवार यांनी केला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कारभारावर टिकेची झोड उठवली.

या सभेमध्ये पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या भाषणामध्ये हे सरकार शेतकऱ्यांची छळवणूक करत आहे. त्यांच्याशी बेईमानी करत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे. ही हल्लाबोल यात्रा ही जनतेची आहे. त्यामुळेच ही हल्लाबोल यात्रा एक मोठे रुप धारण करत असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांनी हिंदीतून भाषण केले ते सर्वांनाच भावले.

सरकारने ऑनलाईन कर्जमाफी जाहीर केली मात्र ऑनलाईन घोटाळ्यामुळे एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळाला नाही.दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ऑनलाईनचे बोगस काम करणाऱ्या इनोवेव्ह कंपनीला १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप विधानपरिशदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.सरकारने जाहिरातीवरही ३०० कोटीची उधळपट्टी केल्याचा आरोप करताना भाजप-सेना हे दोन जनतेला भासवणारे महा ठग असल्याचा टोला लगावला.

सभेचे प्रास्ताविक आमदार राहुल मोटे यांनी केले. तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारवर टिकेची झोड उठवली. दुसऱ्यादिवशी भूममध्ये झालेल्या जाहीर सभेलाही मोठी गर्दी पाहायला मिळाली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार