शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, "अन्य राज्ये चुकीची आकडेवारी देत असल्याची शक्यता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:53 IST

Coronavirus In Maharashtra : लोकांनी नियमांचं पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असा राजेश टोपे यांचा इशारा

ठळक मुद्देलोकांनी नियमांचं पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असा राजेश टोपे यांचा इशारानिवडणुका असलेल्या राज्यांवरही निशाणा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अन्य राज्यांकडून येणाऱ्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अन्य राज्य कोरोना बाधितांच्या दररोजच्या संख्येबाबत योग्य माहिती देत नाहीत असं वाटतं, असं टोपे म्हणाले. तसंच राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमागे लोकांचा हलगर्जीपणा आणि कोरोनाच्या वाढत्या चाचण्या असल्याचंही त्यांन नमूद केलं. "या गोष्टीची शक्यता आहे की अन्य राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची योग्य संख्या सांगितली जात नाही. महाराष्ट्रात योग्य आणि पारदर्शकपणे सर्व पावलं उचलली जात आहेत. नुकतीच गुजरातमध्ये एक क्रिकेट मॅच पार पडली यावेळी ती मॅच पाहण्यासाठी ७५ हजारांपेक्षा अधिक लोकं आली होती. मी स्वत: ते टीव्हीवर पाहिलं. या गर्दीदरम्यान कोणीही सोशल डिस्टंन्सिंग पाळत नसल्याचंही दिसलं," असं टोपे म्हणाले. राजेश टोपे यांनी इंडिया टुडेशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान यावर भाष्य केलं.  

निवडणुका असलेल्या राज्यांवरही निशाणायावेळी राजेश टोपे यांनी निडणुका पार पडणाऱ्या राज्यांवरही निशाणा साधला. चार राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या रॅलीवर नजर टाकली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोणीही मास्क परिधान करतानाही दिसत नाही. हे सर्व पाहून ही राज्ये कोरोनाबाधित रुग्णांची योग्य संख्या नोंदवतात की नाही अशी शंका येत असल्याचंही टोपे म्हणाले. दरम्यान, टोपे यांनी राज्यातील लोकांना इशाराही दिला. जर राज्यात लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर सरकारकडे लॉकडाऊन लावण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसेल, असंही ते म्हणाले. 

कडक कारवाईचे आदेश"सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कबाबतच्या नियमांचं पालन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी असे निर्देश सर्व जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार सध्या लवकरात लवकर लसीकरण करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. आम्ही राज्यात दररोज जवळपास ३ लाख लोकांचं लसीकरण करत आहोत. या हिशोबानं आम्ही एका आठवड्यात २०-२१ लाख लोकांचं लसीकरण करत आहोत," असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसRajesh Topeराजेश टोपेElectionनिवडणूक