ओसरतेय ‘राजा’ची गर्दी!
By Admin | Updated: September 3, 2014 02:26 IST2014-09-03T02:26:10+5:302014-09-03T02:26:10+5:30
तासन्तास रांगेत ताटकळणो, कार्यकत्र्याची मनमानी आणि गर्दीचे निकृष्ट दर्जाचे व्यवस्थापन या सगळ्याला त्रसलेल्या भाविकांनी ‘राजा’कडे न जाण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे

ओसरतेय ‘राजा’ची गर्दी!
कार्यकत्र्याची मनमानी : अन्य मंडळांकडे वळले भाविक
मुंबई : तासन्तास रांगेत ताटकळणो, कार्यकत्र्याची मनमानी आणि गर्दीचे निकृष्ट दर्जाचे व्यवस्थापन या सगळ्याला त्रसलेल्या भाविकांनी ‘राजा’कडे न जाण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षापासून प्रसिद्धीच्या झोतात आलेला आणि त्यामुळे दूरदूरहून ‘राजा’च्या चरणी येणा:या भाविकांचा ओघ थंडावलेला जाणवतोय. मंगळवारी दुपारी मुखदर्शनाच्या रांगेतील भाविकांची संख्या अत्यल्प दिसून आली़ कार्यकत्र्याच्या मुजोरीमुळे ‘राजा’चे भक्त दुरावत असल्याचे चित्र दिसून आले.
गेल्या दोन वर्षात ‘लालबागचा राजा’च्या दर्शनात कार्यकत्र्याची असभ्य वर्तणूक, धक्काबुक्की, शाब्दिक चकमक आणि त्यामुळे उत्सवात होणारे अनुचित प्रकार सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे आता मुंबईतील भक्तांनी तर ‘राजा’चे दर्शन दुरूनच घेण्याचे ठरविले आहे. यंदा मुंबईपेक्षा अन्य ठिकाणच्या लोकांची रीघ अधिक असल्याचेही दिसून येत आहे. मात्र मंगळवारी दुपारी लालबाग परिसरात मुखदर्शनाच्या रांगेत भाविकच दिसून आले नाहीत. त्यामुळे आता तरी मंडळाच्या कार्यकत्र्यानी धडा घेत भाविकांशी असभ्य वर्तणूक करू नये. लालबागच्या राजाचे शिस्तबद्ध पद्धतीने सर्वाना दर्शन मिळावे, अशी आशा भाविकांकडून व्यक्त होत आहे.
पूर्वी केवळ ‘मार्केटचा राजा’ अशी ख्याती असणारा लालबागचा राजा काही वर्षात चर्चेत आला. या कारणास्तव गिरणगाव परिसरातील इतर गणोशोत्सव मंडळांकडेही भाविकांनी काहीसे दुर्लक्ष करीत राजाच्या दर्शनाचा ‘हट्ट’ सुरू केला. त्यामुळे याच परिसरातील गणोश गल्लीचा गणपती, तेजुकायाचा राजा, रंगारी बदक चाळीचा गणपती आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळांच्या गणोशमूर्ती पाहण्यासाठी ‘राजा’च्या तुलनेत गर्दी मंदावली. परंतु प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मनमानी कारभार करणा:या कार्यकत्र्याना आता सामान्य गणोशभक्तही त्रसले असून, त्यामुळे यंदाच्या गणोशोत्सवात ‘राजा’च्या दर्शनाची गर्दी ओसरताना दिसतेय. (प्रतिनिधी)
च्मुखदर्शनाची रांग सोडण्यावरून मंडळाच्या कार्यकत्र्यानी बंदोबस्तावरील पोलिसांशी हुज्जत घातली. दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. हा प्रकार इतका वाढला की मंडळाच्या पदाधिका:यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर मुखदर्शनाच्या रांगेभोवती निर्माण झालेला तणाव निवळला. याप्रकरणी हुज्जत घालणा:या कार्यकत्र्याविरोधात काळाचौकी पोलिसांनी एनसी नोंदविल्याची माहिती अप्पर आयुक्त आर. डी. शिंदे यांनी लोकमतला दिली. दरम्यान, शाब्दिक बाचाबाचीनंतर पोलीस शिपायाच्या कानशिलात भडकावण्यात आल्याची चर्चा सर्वदूर पसरली होती. मात्र अप्पर आयुक्त शिंदे यांनी ती अफवा असल्याचे सांगितले.