शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अनाथ मुलींना समुपदेशन सेवा, सुरक्षितता मिळावी - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 20:40 IST

या विषयाबाबत नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या सुचनेच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाकडून येथील मुलींसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

मुंबई : बालसंगोपन योजना राज्यातील मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे. परंतु इथे असणाऱ्या मुलींचे वय १२ वर्षांपेक्षा वाढले की मुलीचे आई - वडील लग्न  उरकण्याची घाई करतात. विशेषत: अनाथ मुलींचे लग्न अल्प वयात लावण्याची समाजाची प्रवृत्ती आहे. त्यामुळे या मुलींना समुपदेशन, सुरक्षितता मिळते आहे की नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.

या विषयाबाबत नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या सुचनेच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाकडून येथील मुलींसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. आज विधानभवनात प्रश्नोत्तराच्या तासात परिषद सदस्य रमेश कराड यांनी राज्यात कोरोना कालावधीत अनाथ झालेल्या मुलांसाठी बालसंगोपन योजनेअंतर्गत बाल न्याय निधीचे वाटप करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. 

नीलम गोऱ्हेंनी अदिती तटकरेंचे केले कौतुक!मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय चांगले उत्तर दिलेले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये महिला बाल विकास विभागाचे अधिकारी चांगलं काम करत आहेत. विशेषतः सांगली जिल्ह्यात अधिकारी प्रत्येक निराधार व  कुटुंबापर्यत पोहोचलेल्या आहेत, असं म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंत्री महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे व विभागाचे कौतुक केले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेVidhan Parishadविधान परिषद