VIDEO- मराठा मोर्चासाठी मुंबईत बाइक रॅलीचं आयोजन
By Admin | Updated: November 6, 2016 11:13 IST2016-11-06T03:21:31+5:302016-11-06T11:13:29+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 6 - राज्यभरात उठलेले मराठा क्रांती मोर्चाचे वादळ आज अखेर मुंबईत धडकले आहे. सकाळी ९ ...

VIDEO- मराठा मोर्चासाठी मुंबईत बाइक रॅलीचं आयोजन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - राज्यभरात उठलेले मराठा क्रांती मोर्चाचे वादळ आज अखेर मुंबईत धडकले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सायन येथील सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत बाइक रॅलीला सुरुवात झाली असून, बाईक रॅली आता भायखळ्याहून सीएसटीच्या दिशेने जात आहे. कोपर्डीतील आरोपींना फाशी आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन या वेळी शासनाला सादर केले जाईल. या बाईक रॅलीमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही सहभागी झाले आहेत.
सोमय्या मैदानावरून निघणारी ही बाइक रॅली सायन सर्कलहून सायन रुग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळाहून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे जात आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कोपर्डी घटनेतील पीडितेचा श्रद्धांजली स्तंभ उभारून रॅलीची सांगता होईल. रॅली यशस्वी व्हावी म्हणून मुंबईत अनेक ठिकाणी बैठका झाल्या
.
https://www.dailymotion.com/video/x844h0y