शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नयनतारा सहगल यांना दिलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांकडून रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 14:45 IST

प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे.

पुणे - प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे कारण देणारा ईमेल सहगल यांना आयोजकांकडून पाठवण्यात आला आहे.  सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या राजकीय दबावामुळे सहगल यांना पाठवण्यात आलेले निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील  साहित्यविश्वात खळबळ उडाली असून, आयोजकांच्या कृतीचा निषेध केला जात आहे.  देशात होत असलेल्या साहित्यिक, विचारवंत यांच्या हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर आलेली गदा, मॉब लिंचीग याबाबत नयनतारा सहगल यांची मते परखड आणि झुंजार आहेत. या सर्व मुद्द्यांचा नयनतारा सहगल यांच्या भाषणात उल्लेख होणार होता. त्यांच्या या भूमिकेचा आगामी निवडणुकांवर परिणाम होईल, या भीतीतून सहगल यांना काही राजकीय दबावामुळे संमेलनाला न येण्याचे पत्र यवतमाळ आयोजकांकडून सहगल यांना ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे, अशी माहिती विशवसनीय सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.   नयनतारा सहगल व्यासपीठावर आल्यास संमेलनाचे पैसे मिळू देणार नाही, अशी धमकी पालकमंत्र्यांनी आयोजकांना दिल्याचे समजते. मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सहगल यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ऐन वेळी मनसेने माघार घेतल्याने आयोजकांवर दबाव आला. त्यामुळे सुरक्षेचे कारण देऊन रात्री आयोजकांडून ईमेलद्वारे पत्र पाठवण्यात आले. याबाबत सहगल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तरीही, त्या आयोजकांकडे भाषणाची प्रत पाठवण्यावर ठाम आहेत.  

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण