शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संपावर संघटना ठाम!

By admin | Updated: August 27, 2016 05:09 IST

केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपावर राज्यातील महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समिती ठाम आहे

मुंबई : देशातील प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपावर राज्यातील महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समिती ठाम आहे. कामगार कायद्यांतील प्रस्तावित कामगारविरोधी बदल रद्द करण्यासाठी राजकीय पक्षांनीही या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन कृती समितीने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी म्हणाले की, सरकारकडून सुरू असलेल्या कामगार कायद्यांतील एकतर्फी बदलांना विरोध करण्यासाठी कृती समितीने बंदची हाक दिली आहे. कामगार कायद्यात सुरू असलेल्या बदलांविरोधात वर्षभरापूर्वी २ सप्टेंबर २०१५ रोजी देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येत देशव्यापी संप केला होता. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकारविरोधात तीव्र भूमिका घेऊन आर्थिक नीती बदलण्याची मागणी कृती समितीने केली आहे. सरकारने २० कामगार कायद्यांचे मूल्यांकन करण्यासाठी कामगार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. मात्र त्या समितीत कामगार संघटनांना प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे कामगार संघटनांसोबत कोणतीही चर्चा न करता कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारने फॅक्टरी कायदा लागू करून याआधीच लाखो कामगारांचे किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, कामाच्या तासांवरील कमाल मर्यादा, सुरक्षेचे उपाय असे मूलभूत अधिकार काढून घेतले असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. त्यामुळे कामगार कायद्यातील कामगारविरोधी बदल मागे घेण्याचे आवाहन समितीने केले आहे. (प्रतिनिधी)>भाजपा वगळता सर्व पक्षांचा पाठिंबाकेंद्र आणि राज्यात सत्तेत असल्याने भारतीय जनता पक्षप्रणीत भारतीय मजदूर संघ या संपामध्ये सामील नसल्याचे कृती समितीने स्पष्ट केले. मात्र डाव्या लोकशाही आघाडीसह डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी या संपाला पाठिंबा दिला आहे.शिवाय ठाण्यातील रंगशारदा सभागृहात २९ सप्टेंबरला शिवसेनेची बैठक पार पडणार आहे. त्या वेळी शिवसेनाप्रणीत कामगार संघटनाही संपात सामील होण्याचा निर्णय जाहीर करतील, असा विश्वास कृती समितीने व्यक्त केला आहे.>आर्थिक व्यवहार ठप्प होणारराष्ट्रीयीकृत बँकाही संपात सामील होणार असल्याने धनादेश वटणावळ बंद राहील. परिणामी रोखीचे आणि धनादेशाचे सर्व व्यवहार शुक्रवारी बंद राहतील. एटीएमचा काही वेळ ग्राहकांना आधार असेल. मात्र रोख संपल्यानंंतर एटीएम सेवाही बंद पडेल आणि आर्थिक व्यवहार ठप्प पडतील, असा दावा उटगी यांनी केला आहे.>कोण संपात सामील?देशव्यापी संपामध्ये देशातील ११ केंद्रीय कामगार संघटना, केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे महासंघ, बँक, विमा, संरक्षण आदी क्षेत्रांतील कामगारांचे अखिल भारतीय महासंघ आणि अन्य क्षेत्रांतील काम करणाऱ्या कामगार संघटना सामील होणार आहेत.>कृती समितीच्या प्रमुख मागण्याकामगार कायद्यांतील प्रस्तावित बदल रद्द करा.कामगार कायद्यांत बदल करण्याआधी कामगार संघटनांसोबत चर्चा करा.गोदी आणि बंदरे, वीज, कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू इत्यादी मोक्याच्या क्षेत्रांमधील खासगीकरण थांबवा.कंत्राटी आणि असंघटित कामगारांना १८ हजार रुपये किमान वेतन द्या.सर्वोच्च न्यायालयाचे फेरीवाल्यांबाबतचे निर्देश व राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा.बांधकाम, घरेलू कामगारांचे कल्याणकारी मंडळाचे पुनर्गठन करून त्यास मान्यता द्या.