शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
2
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
3
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
4
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
5
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
6
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
7
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
8
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
9
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
10
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
11
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
12
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
13
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
15
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
16
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
17
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
18
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
19
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
20
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले

७३१ व्यक्तींच्या अवयवदानाने २,१०१ व्यक्तींना जीवनदान, दात्यांच्या कुटुंबीयांचा होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 14:47 IST

सध्याच्या घडीला राज्यात चार विभागीय प्रत्यारोपण केंद्र  कार्यरत आहे. त्यात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील केंद्रांचा समावेश आहे.

मुंबई : अवयवदानाचे नियमन करून २१०१ व्यक्तींना जीवनदान देणाऱ्या देशातील पहिल्या मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्थेने आतापर्यंत ७३१ मेंदूमृत दात्यांच्या अवयवदानाचे नियमन केले असून, रौप्यमहोत्सवानिमित्ताने काही अवयदात्या कुटुंबातील सदस्यांचा सायन रुग्णालयात सत्कार करण्यात येणार आहे.सध्याच्या घडीला राज्यात चार विभागीय प्रत्यारोपण केंद्र  कार्यरत आहे. त्यात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील केंद्रांचा समावेश आहे. ही  चारही केंद्र आता विभागवार काम करतात आणि आपापल्या विभागातील रुग्णालयांशी संलग्न असतात. केंद्रांच्या विभाग स्तरिय रचनेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अवयव प्रत्यारोपणासाठी पाठपुरावा करण्यात सोयीस्कर ठरते.

समितीचे काम कसे चालते? अवयवांसाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची यादी बनविणे, मेंदूमृत दात्याकडून अवयव प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे संबंधित रुग्णाला ते उपलब्ध करून देणे, हे या समितीचे मुख्य काम आहे. तसेच अवयवदानाबाबत जनजागृती करणे, रुग्णालयांना कायद्याची माहिती करून देणे, अवयवनिहाय तज्ज्ञांची समिती स्थापन करणे, अशी कामेही समितीमार्फत केली जातात. अवयवदान प्रक्रियेत कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही, असे नियोजन येथे करण्यात येते.

अवयवदानाविषयीच्या जनजागृती मोहिमेत अनेक सामाजिक संस्थांना सहभागी करून घेण्यात आले आहे.  या चळवळीला गती देण्यासाठी सर्वच स्तरांतील नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे.डॉ. सुरेंद्र माथूर, अध्यक्ष, मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र

असा कायदा, असे केंद्र...देशात १९९४ मध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू झाला. २०१७ साली त्यात सुधारणा करण्यात आल्या. हा कायदा झाल्यानंतर १९९७ ते २००० दरम्यान काही सरकारी रुग्णालयांत मेंदूमृत अवयवदानातून त्याच रुग्णालयातील प्रतीक्षेवरील रुग्णांवर अवयव प्रत्यारोपण झाले. त्यानंतर ३१ मार्च २००० मध्ये कायद्यानुसार मुंबई प्रत्यारोपण समन्वय समिती सुरू होऊन या समितीमार्फत राज्यातील  प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे नियमन सुरू झाले.

टॅग्स :Organ donationअवयव दान