शासनाकडून मराठा, मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश जारी

By Admin | Updated: July 12, 2014 01:27 IST2014-07-12T01:27:51+5:302014-07-12T01:27:51+5:30

शिक्षण आणि नोक:यांमध्ये मराठा समाजाला 16 तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा अध्यादेश शुक्रवारी राज्य शासनाने जारी केला.

Ordinance of Maratha, Muslim reservation, by the government | शासनाकडून मराठा, मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश जारी

शासनाकडून मराठा, मुस्लीम आरक्षणाचा अध्यादेश जारी

मुंबई : शिक्षण आणि नोक:यांमध्ये मराठा समाजाला 16 तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा अध्यादेश शुक्रवारी राज्य शासनाने जारी केला. त्यामुळे हे आरक्षण तात्काळ लागू झाले आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी त्यावर दोन दिवसांपूर्वीच स्वाक्षरी केली होती. 
शैक्षणिक आरक्षण हे सर्व विद्यापीठे, ज्यांना शासनाचे अनुदान मिळते अशा संस्था, शासनाची मालकी आणि नियंत्रण असलेल्या शैक्षणिक संस्था तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये लागू राहील. 
राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त होणा:या किंवा न होणा:या संस्थांमध्येही आरक्षण असेल. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. दोन्ही आरक्षणांसाठी सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेली उत्पन्नमर्यादेपेक्षा (क्रिमिलेयर) कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबालाच आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. 
नोक:यांमधील आरक्षण सर्व शासकीय, निमशासकीय विभाग, महामंडळे, शासकीय कंपन्यांमध्ये लागू असेल. (विशेष प्रतिनिधी)
 

 

Web Title: Ordinance of Maratha, Muslim reservation, by the government