दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटपाचे अध्यादेश
By Admin | Updated: December 31, 2015 17:19 IST2015-12-31T16:57:17+5:302015-12-31T17:19:53+5:30
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटप करण्याचा अध्यादेश आज राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे लवकरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटपाचे अध्यादेश
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटप करण्याचा अध्यादेश आज राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे लवकरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार आहे. महाराष्ट्रातील १५,७४७ गावांना ३,५७८ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. कापूस उत्पादकांना मात्र दुष्काळनिधीचे वाटप होणार नाही. कापूस पिकाचे क्षेत्र वगळता अन्य पिकांसाठी ही मदत असेल असेल असे सरकारच्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी ३१४ कोटी रुपये तर चारा छावण्यांसाठी १०९ कोटी ९४ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
नुकताच, केंद्राकडून महाराष्ट्रास दुष्काळ निवारणासाठी ३१०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे, त्या धर्तीवर आणि विरोधकांनी या मुद्यावरून संसदेत सतत केलेल्या गोंधळामुळे राज्य सरकारने मदत जाहीर केल्याचे दिसत आहे.