ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश
By Admin | Updated: July 14, 2016 18:27 IST2016-07-14T18:27:44+5:302016-07-14T18:27:44+5:30
'आमचं गाव-आमचा विकास' या उपक्रमांतर्गतच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणा-या एका ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी गुरूवारी सायंकाळी

ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १४ -'आमचं गाव-आमचा विकास' या उपक्रमांतर्गतच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणा-या एका ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी गुरूवारी सायंकाळी मालेगाव गटविकास अधिकाऱ्यांना दिले. मालेगाव तालुक्यातील काळाकामठा येथील कार्यक्रमाला ग्रामसेवक नवघरे यांनी दांडी मारली होती. याची दखल घेत गणेश पाटील यांनी सदर ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश गटविकास अधिका-यांना दिले. यामुळे कामचुकार ग्रामसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली.