२७ गावांतील बेकायदा बांधकामांची माहिती देण्याचे आदेश
By Admin | Updated: June 8, 2016 02:31 IST2016-06-08T02:31:08+5:302016-06-08T02:31:08+5:30
२७ गावांतील बेकायदा बांधकामांची माहिती दोन महिन्यांत द्या, असे सक्त आदेश नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी मनपा आयुक्त आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले.

२७ गावांतील बेकायदा बांधकामांची माहिती देण्याचे आदेश
चिकणघर : केडीएमसीच्या हद्दीतील २७ गावांतील बेकायदा बांधकामांची माहिती दोन महिन्यांत द्या, असे सक्त आदेश नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी मनपा आयुक्त आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले.
केडीएमसी, एमएमआरडीए आणि २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची संयुक्त बैठक मंत्रालयात झाली. यावेळी आयुक्त रवींद्रन, एमएमआरडीएचे अधिकारी आणि समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष गुलाब वझे उपस्थित होते. २७ गावांत ग्रा.पं.च्या परवानगीशिवायच्या बांधकामांची संख्या किती आहे, याची माहिती केडीएमसीकडे नाही. त्यामुळे सरकारने केडीएमसीला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. ग्रा.पं.ला केवळ तळ अधिक दोन मजले एवढीच परवानगी देता येते. असे असूनही मोठे टॉवर उभे राहिले आहेत. त्यामुळे अशा बांधकामांवर कारवाई होणारच.