‘लोकमत दीपोत्सव’चा अंक मागवा आॅनलाइन

By Admin | Updated: October 19, 2016 05:55 IST2016-10-19T05:55:15+5:302016-10-19T05:55:15+5:30

या दिवाळीत रंगते आहे एक समृद्ध मैफल. रुटीनचा हात सोडून सात भटक्यांनी केलेली भन्नाट रोडट्रीप - कन्याकुमारी ते श्रीनगर!

Order the 'Lokmat Dipotsav' issue online | ‘लोकमत दीपोत्सव’चा अंक मागवा आॅनलाइन

‘लोकमत दीपोत्सव’चा अंक मागवा आॅनलाइन


मुंबई : या दिवाळीत रंगते आहे एक समृद्ध मैफल. रुटीनचा हात सोडून सात भटक्यांनी केलेली भन्नाट रोडट्रीप - कन्याकुमारी ते श्रीनगर! अनुभवा बदलत्या भारताचा अद्भुत थरार, यंदाच्या लोकमत दीपोत्सवमध्ये... हा अंक स्वत:साठी घ्या, स्नेहीजनांना ‘दिवाळी भेट’ पाठवा! भारतभरात कुठेही घरपोच अंक मिळविण्यासाठीwww.deepotsav.lokmat.com या संकेतस्थळावर आॅनलाइन खरेदी करण्याचीही सोय आहे.
कन्याकुमारी ते श्रीनगर हा ३,४७५ किमीचा प्रवास, ज्यामध्ये येतात ११ राज्ये आणि प्रवासासाठी लागले ३५ दिवस. या प्रवासात भेटलेल्या गावांच्या, शहरांच्या, विजयांच्या, पराभवांच्या, बदलांच्या, बदलत्या माणसांच्या कहाण्या!
शिवाय, या वर्षीच्या मैफलीत भेटा, रतन टाटा, प्रियंका चोप्रा, प्रिसिला चान आणि रस्किन बाँड यांना... त्याबरोबरच आहेत, पाकिस्तान व चीनमधली तरुण पिढी भारताकडे कशी पाहते याचे स्पेशल रिपोटर्स. (प्रतिनिधी)

Web Title: Order the 'Lokmat Dipotsav' issue online