माजी न्यायाधीशाला रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश
By Admin | Updated: November 15, 2014 02:11 IST2014-11-15T02:11:28+5:302014-11-15T02:11:28+5:30
ससून रुग्णालयातून परस्पर येरवडा कारागृहात का हलविले, यासंदर्भात येरवडा कारागृह अधीक्षक व ससून रुग्णालयातील सजर्नने अहवाल सादर करावा, असा आदेश विशेष न्यायालयाने दिला.

माजी न्यायाधीशाला रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश
पुणो : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील माजी न्यायाधीशाला ससून रुग्णालयातून परस्पर येरवडा कारागृहात का हलविले, यासंदर्भात येरवडा कारागृह अधीक्षक व ससून रुग्णालयातील सजर्नने अहवाल सादर करावा, असा आदेश विशेष न्यायालयाने दिला. तसेच आरोपीला पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करावे, डॉक्टरांनी त्याच्या जखमांची तपासणी करून योग्य उपचार करावेत, असेही न्यायालयाने या आदेशात म्हटले आहे.
माजी न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (38) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, उजव्या पायावर शस्त्रक्रिया झाली असल्याने न्यायालयाच्या आदेशाने उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी ससून रुग्णालयातून त्याला परस्पर येरवडा कारागृहात हलविले होते. येरवडा कारागृह अधीक्षक व सजर्न यांनी आरोपीला परस्पर का हलविण्यात आले होते, याचा अहवाल 19 नोव्हेंबरला सादर करावेत, असे विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी आदेशात म्हटले आहे. बलात्कार प्रकरणात माजी न्यायाधीश अडकल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.