शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नरेगातील गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश, विरोधकांची दोषींवर कारवाई करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 06:23 IST

बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समितीत नरेगामधून कामाची देयके अदा करताना बोगस व बनावट पावत्या जोडून निधी उचलण्यात आला आहे.

नागपूर : बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समितीत नरेगामधून कामाची देयके अदा करताना बोगस व बनावट पावत्या जोडून निधी उचलण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बीड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे, अशी माहिती रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य अमरसिंह पंडित यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, या प्रकरणात फसवणूक झाली. विक्रीकर व जीएसटी भरण्यात आलेला नाही. बेनामी बँक खाते उघडून अफरातफ र करण्यात आल्याचे निदर्शनास आणले. या प्रकरणातील दोषींच्या विरोधात तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. अमरसिंह पंडित म्हणाले, बनावट व खोट्या फर्मला निधी देण्यात आल्याचे निदर्शनास आणले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.२७१४ विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. यातील १०८४ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. नगद नारायण कंपनी,माऊ ली ड्रील कंपनी यासह अन्य कंपन्यांची बिले सादर करण्यात आली. परंतु या कंपन्या नोंदणीकृत नाहीत.

टॅग्स :newsबातम्याMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार