शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 15:33 IST

मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकायांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे.

ठळक मुद्दे कर्ज वसुली न्यायाधिकारणाने दिला निकालमोदीने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे घेतली धाव 

पुणे: हिरा व्यापारी नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला ७ हजार ३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश आज येथील कर्ज वसुली न्यायाधिकरनचे  पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आहेत.मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकायांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. बँकेचे कर्मचारी गोकुळ नाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांनी मोदी यांना मदत केल्याचे निकालात नमूद आहे. 

मोदीने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. सुनावणीत बँकेच्या वकिलांनी आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. तर मोदी यांच्यावतीने कोणीही न्यायालयासमोर हजर नव्हते. त्यामुळे बँकेच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल 6 जुलै रोजी देण्यात येईल, असे स्पष्ट होते. 

 तीनपैकी दोन दावे  निकाली :बँकेने नीरव मोदी विरोधात तीन दावे दाखल केले असून त्यांपैकी पहिला दावा सात हजार कोटी रुपयांचा आहे. दुसरा दावा तीनशे कोटी रुपयांचा आहे, तर तिसरा दावा हा एक हजार 700 कोटी रुपयांचा आहे. त्यातील दोन दाव्यांचा युक्तिवाद होऊन निकाल झाला.

टॅग्स :PuneपुणेNirav Modiनीरव मोदीPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकfraudधोकेबाजीCourtन्यायालय