स्मार्ट गावांची निर्मिती करण्याचे आदेश!
By Admin | Updated: February 27, 2015 01:55 IST2015-02-27T01:55:11+5:302015-02-27T01:55:11+5:30
ग्रामीण भागाशी संबंधित गृहनिर्माण, बचत गट, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास आदी योजना चांगल्या पद्धतीने अमलात आणून

स्मार्ट गावांची निर्मिती करण्याचे आदेश!
मुंबई : ग्रामीण भागाशी संबंधित गृहनिर्माण, बचत गट, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास आदी योजना चांगल्या पद्धतीने अमलात आणून स्मार्ट गावांची निर्मिती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाचा पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गावकऱ्यांना विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी न जाता गावपातळीवरच ती उपलब्ध होणे आवश्यक आहेत. ग्रामपंचायतींचे प्रशासन उत्तम आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ‘गुड गव्हर्नन्स’ची संकल्पना गाव पातळीवर राबवणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या गृहनिर्माण, रस्ते, विकासविषयक विविध योजना चांगले तंत्रज्ञान वापरून राबवण्यात याव्यात, जेणेकरून त्यांचा दीर्घ काळासाठी वापर करता येऊ शकेल.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत नवीन रस्त्यांची निर्मिती करण्याबरोबर जुन्या रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणावरही भर दिला जाणार आहे. याखेरीज आमदार आदर्श
ग्राम योजना राबविण्याचे प्रस्तावित असून या माध्यमातून राज्यात सर्वांगसुंदर अशी आदर्श गावे निर्माण केली निर्माण केली जातील. ग्रामपंचायतींना स्वत:च्या इमारती उपलब्ध करणे या बाबींचा आराखड्यात समावेश असल्याचे नमूद केले. राज्यमंत्री दीपक केसरकर हेही यावेळी उपस्थित होते.
(विशेष प्रतिनिधी)