पालखीमार्ग रुंदीकरणाला विरोध
By Admin | Updated: August 2, 2016 01:35 IST2016-08-02T01:35:29+5:302016-08-02T01:35:29+5:30
इंदापूर तालुक्यातील पालखीमार्ग रुंदीकरणाला महमार्गाशेजारील गावांनी विरोध दर्शविला

पालखीमार्ग रुंदीकरणाला विरोध
लासुर्णे : इंदापूर तालुक्यातील पालखीमार्ग रुंदीकरणाला महमार्गाशेजारील गावांनी विरोध दर्शविला. ज्या वेळी अतिक्रमण काढणार आहेत, त्या वेळी गावकरी रस्त्यावर उतरणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत गावकऱ्यांनी आमदार, खाासदार व पालकमंत्री यांनाही निवेदने दिली आहेत.
संत तुकाराममहाराज व ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्या वेळी वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे. या दोन्ही सोहळ्यांना गर्दी वाढत आहे. भविष्यात पालखी सोहळ्याच्या वेळी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी तसेच वाहतुकीच्या समस्येसाठी केंद्रीय रस्तेविकास महामंडळाने या दोन्ही राज्य महामार्गांचे रुंदीकरण करण्याचे ठरविले आहे. यासाठी लवकरच या पालखीमार्गाच्या बारामती-इंदापूर या मुख्य रस्त्यावर सध्या मोजणी सुरू झाली आहे.
या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतजमिनी, राहती घरे व दुकाने बाधित होणार आहेत. गावेच्या गावे विरोध करणार आहेत. ज्या वेळी घरे व दुकाने काढणार, त्या वेळी गावकरी रस्त्यावर उतरून विरोध करणार असल्याचे बोलले जाते. या वेळी शासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्ते दळणवळण हा राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा आहे हे शंभर टक्के बरोबर असले, तरी हे होत असताना यामध्ये समाजातील तीन घटक भरडले जातात. जे की पिढ्यान् पिढ्या या जागेवर व्यवसाय करून आपले कुटुंब चालवतात.
या रुंदीकरणामुळे या व्यापाऱ्यांवर मोठे संकट येणार असून, त्यांचे प्रंपच उघड्यावर येतील. यामुळे या रुंदीकरणाला आमचा विरोध आहे. आमदार, खासदार व पालकमंत्री यांना लेखी निवेदन दिले आहे.
या निवेदनात आम्ही तीन
पर्याय दिले आहेत. यामध्ये जपालखीमार्ग रुंदीकरणाला ग्रामस्थांचा विरोध गावातून रुंदीकरण होणार असेल, तर हद्द कमी
करावी. दुसरा हडपसरसारखा एकखांबी उड्डाणपूल बांधावा म्हणजे पुलाच्या खालूनही वाहतूक होईल. तिसरा गावाच्या बाहेरून बायपास काढण्यात यावा.
>ग्रामस्थांचा विचार व्हावा
पिढ्यान् पिढ्या घर बांधून वास्तव्यात असणारे, तसेच शेतकरी शेती करून आपले पोट भरतो. तसेच शासनाने दिलेल्या मोबदल्यात या भरडलेल्या व्यक्ती स्थिरस्थावर होणार का, याचा विचार शासनाने करावा. कारण, शासनाने या कामाची निविदा काढण्याअगोदर या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे, असे येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन वाकसे यांनी सांगितले. तर, निमगाव येथील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ डोंगरे म्हणाले, की निमगावमध्ये रस्त्याच्या दुतर्फा छोटे व्यापारी गाळे असून, त्यावर त्यांची रोजीरोटी अवलंबून आहे.