मोदींच्या अर्थसंकल्पाला नक्षलींचा विरोध
By Admin | Updated: August 1, 2014 04:19 IST2014-08-01T04:19:43+5:302014-08-01T04:19:43+5:30
मोदी सरकारने सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पाचा नक्षलवाद्यांनी प्रखर विरोध केला आहे. २८ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान माओवादी शहीद सप्ताह साजरा करीत आहे.

मोदींच्या अर्थसंकल्पाला नक्षलींचा विरोध
गडचिरोली : मोदी सरकारने सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पाचा नक्षलवाद्यांनी प्रखर विरोध केला आहे. २८ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान माओवादी शहीद सप्ताह साजरा करीत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या आसरअल्ली गावात माओवादी संघटनेने बुधवारी रात्री फलक लावून सरकारच्या अर्थविषयक धोरणाचा निषेध केला आहे.
यासंदर्भात फलकावर भूमिका स्पष्ट करताना भाकपा (माओवादी) संघटनेने म्हटले आहे की,
सरकारच्या या धोरणामुळे लुटेरे
शोषक वर्ग व दलाल तसेच भांडवलदार यांना फायदा पोहोचविण्याचे काम सुरू आहे. मोदी सरकारच्या पहिल्या आम बजेटचा बहिष्कार करा, असे आवाहन माओवाद्यांनी जनतेला या पत्रकाद्वारे केला आहे.
मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कुठलाही दिलासा मिळालेला नाही.
महागाई, बेरोजगारी, उपासमार, भ्रष्टाचार व महिलांवरील हिंसाचार वाढत आहे. जनतेने केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध एकजूट होऊन करावा व आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जनआंदोलन सुरू करावे, असेही माओवादी संघटनेने म्हटले आहे. (प्रतिनिधी)