विरोधी पक्षनेत्याचा निर्णय लवकरच
By Admin | Updated: December 11, 2014 01:50 IST2014-12-11T01:50:47+5:302014-12-11T01:50:47+5:30
विरोधी पक्षनेता कोण, यावर बुधवारी विधान परिषदेत चांगलीच चर्चा रंगली. या पदासाठी काँग्रेसही स्पर्धेत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. एक-दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल,

विरोधी पक्षनेत्याचा निर्णय लवकरच
नागपूर : विरोधी पक्षनेता कोण, यावर बुधवारी विधान परिषदेत चांगलीच चर्चा रंगली. या पदासाठी काँग्रेसही स्पर्धेत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. एक-दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.
पहिल्या सत्रत सत्ताधारी पक्षाने सभागृहाचे नेते आणि उपनेतेपदी अनुक्रमे महसूल मंत्री एकनाथ खडसे व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची बुधवारी सभागृहात घोषणा केल्यानंतर दुपारच्या सत्रत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, सतीश टकले, अमरसिंह पंडित यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला. दोन दिवस झाले. सभागृहाचा विरोधी पक्षनेता कोण, याचा निर्णय झाला नाही. सभागृहाच्या कामकाजात या पदाला महत्त्व आहे. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक म्हणजे 28 सदस्य असल्याने याबाबत आजच निर्णय जाहीर करावा, अशी मागणी या सदस्यांनी केली. शेकापचे जयंत पाटील म्हणाले, सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही, हे प्रथमच घडत आहे. सभागृहाच्या नेत्याची घोषणासुद्धा अधिवेशन सुरूझाल्यानंतर दोन दिवसांनी झाली. ही बाब सभागृहाच्या परंपरेला धरून नाही.
रिपाइंचे जोगेंद्र कवाडे यांनी राष्ट्रवादीच्या दाव्यालाच आव्हान दिले. राष्ट्रवादीने यापूर्वी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला असल्याने त्यांचा या पदासाठीचा दावा योग्य आहे काय? असा सवाल त्यांनी केला. लागलीच तटकरे यांनी कवाडे यांना प्रत्युत्तर दिले. (प्रतिनिधी)
च्सभापतींच्या निवेदनामुळे काँग्रेस विधान परिषदेतही विरोधी पक्षनेतेपदाच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबत आपली भूमिका ठरवू, असे माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.