शहांच्या सभेनिमित्त गोव्यात देशीभाषाप्रेमींची निदर्शने
By Admin | Updated: August 20, 2016 21:07 IST2016-08-20T21:07:35+5:302016-08-20T21:07:35+5:30
भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यकत्र्यानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचे औचित्य साधून शनिवारी दोनापावल येथे रस्त्याच्या बाजूने राहून सरकारविरुद्ध निदर्शने केली.

शहांच्या सभेनिमित्त गोव्यात देशीभाषाप्रेमींची निदर्शने
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २० - भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यकत्र्यानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचे औचित्य साधून शनिवारी दोनापावल येथे रस्त्याच्या बाजूने राहून सरकारविरुद्ध निदर्शने केली. तसेच काळे ङोंडे दाखवत इंग्रजी शाळांना अनुदान देण्याच्या सरकारी निर्णयाचा निषेध केला.
राज्यात मराठी-कोंकणी प्राथमिक शाळांनाच अनुदान मिळायला हवे, अशी भाभासुमंची मागणी आहे. डायोसेशन संस्थेच्या 135 इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करा, अशी मागणी भाभासुमंच्या कार्यकत्र्यानी लावून धरली आहेत. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक आहेत. कार्यकत्र्यानी शनिवारी निदर्शने करताना विशेषत: संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या. इंग्रजी शाळांना अनुदान सुरू ठेवणो हे र्पीकर यांचे षडयंत्र आहे, असे लिहिलेले फलक भाभासुमंच्या कार्यकत्र्याच्या हातात होते. पोलिसांनी मुख्य रस्त्यावर आंदोलकांना अडविले. मग त्यांनी तिथेच थांबून निदर्शने सुरूच ठेवली. आपला आवाज शहा यांच्यार्पयत पोहचावा असा देशी भाषाप्रेमी आंदोलकांचा हेतू होता.
दरम्यान, भाजपचे अध्यक्ष शहा हे सभेपूर्वी दोनापावलच्या मार्गाने काबोर-राजनिवासावर जाऊन राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना भेटून आले.
(खास प्रतिनिधी)