व्यवसाय कराला शिक्षण सेवकांचा विरोध
By Admin | Updated: May 5, 2015 01:33 IST2015-05-05T01:33:51+5:302015-05-05T01:33:51+5:30
मुंबईत तुटपुंजा मानधनावर उपजीविका भागविणाऱ्या शहरातील विविध शाळांमधील शिक्षण सेवकांकडून नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करकपात होत आहे.

व्यवसाय कराला शिक्षण सेवकांचा विरोध
मुंबई : मुंबईत तुटपुंजा मानधनावर उपजीविका भागविणाऱ्या शहरातील विविध शाळांमधील शिक्षण सेवकांकडून नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करकपात होत आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शिक्षणसेवकांकडून व्यवसाय कर घेण्यात येऊ नये अन्यथा याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने शिक्षण निरीक्षक कार्यालयांना दिला आहे.
दरमहा ७ हजार ५०० रुपयांपर्यंत मानधन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून व्यवसाय कर आकारण्यात येऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. राज्यात १ जुलै २०१४ पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तरीही शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयांकडून शिक्षणसेवकांच्या मानधनातून १७५ रुपयांची कपात सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.(प्रतिनिधी)