कांदा गोणी मार्केट विरोधात सर्वपक्षीय एल्गार
By Admin | Updated: July 30, 2016 20:11 IST2016-07-30T20:11:46+5:302016-07-30T20:11:46+5:30
कांदा गोणी मार्केट विरोधात शेतक-यांनी एल्गार पुकारला असून बुधवार पासून कांदा गोणी लिलाव होऊ देणार नाही हि भूमिका जाहीर केली

कांदा गोणी मार्केट विरोधात सर्वपक्षीय एल्गार
>ऑनलाइन लोकमत -
लासलगाव (नाशिक), दि. 30 - शासनाच्या नियमन मुक्ती विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आडमुठे धोरणाच्या विरोधात शनिवारी सायंकाळी लासलगाव खरेदी विक्री संघात सर्वपक्षीय बैठकीत कांदा गोणी मार्केट विरोधात शेतक-यांनी एल्गार पुकारला असून बुधवार पासून कांदा गोणी लिलाव होऊ देणार नाही हि भूमिका जाहीर केली. सोमवार एक ऑगस्ट रोजी निफाड तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना यासंदर्भात परिसरातील शेतकरी निवेदन देणार असून बुधवारपासून लासलगाव, निफाड मार्केट यार्डात गोणी लिलाव होऊ देणार नाही अशी भूमिका सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या बैठकीत जाहीर केली.
शेतकऱ्यांना वेठीस धरून शासनाच्या नियमन मुक्तीच्या विरोधात शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या तोंडून नको ते वदवून घेतले जात आहे. या पद्धतीने शासनावर दबाव टाकण्याचा व्यापाऱ्यांच्या कुटील डाव असून तो उधळून लावण्यासाठी सर्वानी कंबर कसावे असे आवाहन भाजपाचे जेष्ठ नेते सुरेश बाबा पाटील यांनी या वेळी केले..
नियमन मुक्ती मुळे बाजार व्यवस्थेत व्यापाऱ्यांची असलेले मक्तेदारी मोडीत निघणार आहे, शेतकऱ्यांची आड्तीच्या जोखंडातून झालेली मुक्तता का क्रांतिकारी निर्णय कुठल्याही परिस्थितीत बदलला जाऊ नये यासाठी आपण सर्वानी जागरूक राहणे गरजेचे आहे वेळ पडल्यास या कमी वेगळी बाजार व्यवस्था उभी करण्याचे सुतोवाच हि यावेळी नानासाहेब पाटील यांनी पाटील याने केले. यासाठी सर्व शेतकरी बांधवानी सोमवारी दुपारी दोन वाजता निफाड तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन भाजपा नेते सुरेश बाबा पाटील व नाफेचे संचालक नानासाहेब पाटील यांनी या वेळी केले.
या बैठकीला भाजपाचे जेष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील,निप्फड नगरीचे प्रथम नागरिक राजाभाऊ शेलार,शेतकरी संघटनेचे बाबासाहेब गुजर,शिवसेना नेते राजाभाऊ दरेकर ,शिवा सुरासे,लासलगाव ग्रा. प. सदस्य डी.के.नाना जगताप,बाजार समितीचे संचालक बबनराव सानप,वैकुंठ पाटील,मोतीराम मोगल,लोकनेते दत्ताजी पाटील बँकेचे संचालक तुळशीराम जाधव,लक्षमण मापारी,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष नितीन घोटेकर,एल.के.बडवर ,राजेंद्र दरेकर,राजाराम मेमाणे,भाजपाचे सुरेश दाते,विलास थोरे,यांच्या सह निफाड तालुक्यातील विविध पक्षाचे पाधादिकारी या बैठकीस हजर होते