कष्टाळू आणि जिद्दी माणसांना जगात संधी - डी.एस. कुलकर्णी
By Admin | Updated: March 29, 2015 00:14 IST2015-03-29T00:14:03+5:302015-03-29T00:14:03+5:30
लातूर जिल्ह्णावर लोकमान्य टिळक आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी प्रेम केले आहे. शैक्षणिक क्षेत्रामुळे लातूरचे नाव जगात आहे. या जिल्ह्णात जिद्दी आणि कष्टाळू माणसे आहेत.

कष्टाळू आणि जिद्दी माणसांना जगात संधी - डी.एस. कुलकर्णी
लातूर : लातूर जिल्ह्णावर लोकमान्य टिळक आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी प्रेम केले आहे. शैक्षणिक क्षेत्रामुळे लातूरचे नाव जगात आहे. या जिल्ह्णात जिद्दी आणि कष्टाळू माणसे आहेत. या छोट्याशा जिल्ह्णातील ४३ आयकॉन्स ‘लोकमत’ने निवडून त्यांची यशोगाथा समाजासमोर आणली. अशा कष्टाळू आणि जिद्दी माणसांना जगात संधी आहे. ते भारताचेच काय अमेरिकेचेसुद्धा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. कारण आयकॉन्स हे स्वत:च स्वत:चे शिल्पकार असतात, असे प्रतिपादन घराला घरपण देणाऱ्या डीएसके विश्व समुहाचे प्रणेते डी.एस. कुलकर्णी यांनी शनिवारी लातूर येथे केले.
येथील हॉटेल ग्रँड विट्सच्या लॉनवर झालेल्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘आयकॉन्स आॅफ लातूर’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, खा. सुनील गायकवाड, सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर, उर्मिला कानेटकर, प्राचार्य अनिरुद्ध जाधव, उद्योजक महेश मलंग, विजय केंद्रे, प्रवीण ब्रिजवासी आदिंची उपस्थिती होती.
कुलकर्णी म्हणाले, उद्योजकांनी संवाद वाढवायला हवा. तर राजेंद्र दर्डा म्हणाले, लातूरने शिवराज पाटील-चाकूरकर, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, दिलीपराव देशमुख असे नेतृत्व दिले. लातूरने शैक्षणिक पॅटर्न निर्माण केला. तो देशात गाजला. डाळ उद्योग, तेल उद्योग, साखर कारखाने या सर्व क्षेत्रांत लातूरने गरुड भरारी घेऊन स्वत: जी प्रगती केली, त्याबरोबर जिल्ह्णाचाही विकास केला.
माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी खा. सुनील गायकवाड, अभिनेत्री क्रांती रेडकर व उर्मिला कानिटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी औरंगाबाद आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन यांनी प्रस्ताविक केले. तर शाखा व्यवस्थापक नितीन खोत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)