रात्रशाळा बंद करण्यास शिक्षक परिषदेचा विरोध
By Admin | Updated: June 10, 2016 05:29 IST2016-06-10T05:29:13+5:302016-06-10T05:29:13+5:30
राज्यातील रात्रशाळा बंद करण्याचा विचार शिक्षण विभागाच्या सचिवांनी व्यक्त केला आहे

रात्रशाळा बंद करण्यास शिक्षक परिषदेचा विरोध
मुंबई : राज्यातील रात्रशाळा बंद करण्याचा विचार शिक्षण विभागाच्या सचिवांनी व्यक्त केला आहे. मात्र तसे केल्यास राज्यातील सुमारे ३५ हजार विद्यार्थी शाळाबाह्य होतील, अशी माहिती शिक्षक परिषदेने दिली आहे. एकही रात्रशाळा बंद करण्याचा
प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरू,
असा इशाराही शिक्षक परिषदेने दिला आहे.
रात्रशाळांमधून अनेकांनी आपले आयुष्य घडविले आहे. आज अनेकजण रात्रशाळेत शिकून उच्च पदावर पोहोचले आहेत. आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करून शिकण्याची इच्छा असल्याने रात्रशाळा बंद करण्याचा घाट घातल्यास विरोध केला जाईल, असा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
>शिक्षक परिषद रात्रशाळा प्रमुख सुनील सुसरे म्हणाले की, राज्यात
176
रात्रशाळा असून मुंबईत यापैकी १३७ शाळा आहेत. या शाळांमध्ये ३५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जी मुले कुठे तरी मजुरी, नोकरी करून कुटुंबाचा आधार बनतानाच शिक्षण घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी रात्रशाळा हा मोठा आधार असतो.