कमळ चिन्हावर लढण्यास रिपाइं कार्यकर्त्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 23:52 IST2017-02-05T23:52:59+5:302017-02-05T23:52:59+5:30

महापालिका निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावर लढविण्यास रिपब्लिकन पार्टी इंडियाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे

Opponents of the RPI activists to fight the lotus symbol | कमळ चिन्हावर लढण्यास रिपाइं कार्यकर्त्यांचा विरोध

कमळ चिन्हावर लढण्यास रिपाइं कार्यकर्त्यांचा विरोध

पुणे : महापालिका निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावर लढविण्यास रिपब्लिकन पार्टी इंडियाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. पुणे स्टेशन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ याविरोधात निदर्शने करण्यात आली. रिपाइंच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्यामुळे आंबेडकरी चळवळीला त्याचा मोठा फटका बसणार आहे. रिपाइंच्या वाट्याला आलेल्या ११ तिकिटांपैकी ५ तिकिटे ही रिपाइंचे सदस्य नसणाऱ्यांना देण्यात आली आहेत असा आरोप आंदोलकांनी केला. या वेळी रिपाइंचे शहर युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष शशिकला वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष संगीता आठवले, माजी नगरसेवक जयदेव रंधवे, संघमित्रा गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Opponents of the RPI activists to fight the lotus symbol