शेतकऱ्यांच्या अडचणींना विरोधकच जबाबदार - कामगारमंत्री पाटील
By Admin | Updated: June 2, 2017 13:01 IST2017-06-02T13:01:06+5:302017-06-02T13:01:06+5:30
सहकार चळवळ ही ग्रामीण भागाचा कणा आहे. मात्र सर्वाथिक काळ सत्तेत राहिलेल्यांनी ही चळवळ कधीच सर्वसामांन्यांच्या हितासाठी चालविली नाही.

शेतकऱ्यांच्या अडचणींना विरोधकच जबाबदार - कामगारमंत्री पाटील
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 2 - सहकार चळवळ ही ग्रामीण भागाचा कणा आहे. मात्र सर्वाथिक काळ सत्तेत राहिलेल्यांनी ही चळवळ कधीच सर्वसामांन्यांच्या हितासाठी चालविली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याचे कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
निलंगा परिसरात आयोजित भाजपाच्या शिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी पिकाला हमी भाव देण्यास कटीबध्द असल्याचे सांगत. राज्य शासन शेतकरी हितासाठी प्रामाणिक् प्रयत्न करीत असून याचे फायदे येणाऱ्या काळात निश्चित दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला