मतपरीक्षा आज

By Admin | Updated: October 15, 2014 01:44 IST2014-10-15T01:44:32+5:302014-10-15T01:44:32+5:30

विधानसभा निवडणुकीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गत दोन आठवड्यांपासून प्रचाराच्या माध्यमातून तयारीला लागलेल्या जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदारसंघातील २११ उमेदवारांची बुधवारी १५ रोजी

Opinion Today | मतपरीक्षा आज

मतपरीक्षा आज

नागपूर : विधानसभा निवडणुकीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गत दोन आठवड्यांपासून प्रचाराच्या माध्यमातून तयारीला लागलेल्या जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदारसंघातील २११ उमेदवारांची बुधवारी १५ रोजी मतदानाच्या माध्यमातून परीक्षा आहे. मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याचा निर्णय रविवारी मतमोजणीनंतर होणार आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने मतदानाची संपूर्ण तयारी केली असून बुधवारी सकाळी ७ वाजतापासून जिल्ह्यातील ४१२० मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी ६ पर्यंत चालेल. जिल्ह्यात ३७,०४,६७६ मतदार आहेत. त्यांच्यासाठी ४१२० मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडे १० हजार इव्हीएम आहेत. त्यापैकी ७४६० लागणार असून उर्वरित राखीव असणार आहेत. विविध केंद्रावर २३८१८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी साहित्य वाटपाची प्रक्रिया मंगळवारी सकाळी सुरूझाली. कर्मचारी रात्रीच मतदान केंद्रावर पोहचले असून बुधवारी सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वी प्रथम उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर यंत्रणांची चाचणी घेण्यात येईल व नंतर मतदानाला सुरुवात होईल.
प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदारांसाठी आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ५० संवदेनशील (क्रिटिकल) केंद्र आहेत. तेथे पोलिसांची विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे.जिल्ह्यात कामठी (उमेदवारांची संख्या १४), सावनेर (उमेदवारांची संख्या १५), रामटेक (उमेदवारांची संख्या १४) आणि उमरेड (उमेदवारांची संख्या १५) मतदारसंघाचा अपवाद सोडला तर शहरातील सहा आणि ग्रामीणमधील काटोल, हिंगणा या मतदारसंघात उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त असल्याने या सर्व ठिकाणी प्रत्येक केंद्रावर मतदानासाठी दोन ईव्हीएमची व्यवस्था करण्यात आली आहे.
अपंगांची स्वतंत्र नोंद
मतदानासाठी आलेल्या अपंग मतदारांची मतदानाच्यावेळी स्वतंत्रपण नोंद केली जाणार आहे. तसे आदेश आयोगाने दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Opinion Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.