"श्रीनिवास"ची शिकार झाल्याचे उघड
By Admin | Updated: April 27, 2017 16:31 IST2017-04-27T15:57:12+5:302017-04-27T16:31:37+5:30
मागील आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवासन या वाघाची हत्या झाल्याच्या प्रकार आज अखेर उघडकीस आला

"श्रीनिवास"ची शिकार झाल्याचे उघड
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 27 - मागील आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवास या वाघाची शिकार झाल्याचे आज अखेर उघडकीस आले. चार दिवसांपूर्वी या वाघाची कॉलर आय डी जंगलात सापडली होती, तेव्हापासून या वाघाचा शोध सुरू होता.
कालपासून एक विशेष पथक जंगलात श्रीनिवासचा शोध घेत होते. आज सकाली नागभीड तालुक्यातील मसेली येथील शेतकरी महादेव ईरपाते याच्या शेतात वाघाला पुरले असल्याचे आढळले. १९ एप्रिलपासून बेपत्ता असलेला श्रीनिवास वाघ शेतातील तारेतील वीज प्रवाहाचा झटका लागून मृत्यू झाला. महादेव इरपाते या शेतकऱ्याने मृत श्रीनिवासचा कॉलर आयडी फेकून दिला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुरून टाकला. दरम्यान, या शेतकऱ्याने गुन्हा कबुल केला आहे.