पंढरपूरात आषाढीपूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे
By Admin | Updated: July 22, 2016 16:55 IST2016-07-22T16:55:35+5:302016-07-22T16:55:35+5:30
आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोट्यावधी रुपये खर्च करुन फक्त पंधरा दिवस आधी करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे करण्यात आली. मात्र या केलेल्या रस्त्यांच्या कामाचे पितळ

पंढरपूरात आषाढीपूर्वी केलेल्या रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे
>- दीपक होमकर
पंढरपूर, दि. 22 - आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोट्यावधी रुपये खर्च करुन फक्त पंधरा दिवस आधी करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे करण्यात आली. मात्र या केलेल्या रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे पडले ते अवघ्या दोन दिवसाच्या पावसाने.
येथे दोन दिवसापासून सुरु झालेल्या रिमझिम पावसाने रस्ते उखडले गेले. तसेच, सगळीकडे चिखल आणि डबकी साठली आहेत. त्यामुळे आषाढ महिन्याच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी परगावहून येणा-या भाविकांसह स्थानिकांचेही हाल होत आहेत.