मुक्त विद्यापीठातील संचालकाची चौकशी
By Admin | Updated: August 11, 2015 01:23 IST2015-08-11T01:23:52+5:302015-08-11T01:23:52+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेत एका संचालकाने नातेवाईकाच्या पेपरमध्ये ‘बदल’ केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर संबंधिताची सखोल

मुक्त विद्यापीठातील संचालकाची चौकशी
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेत एका संचालकाने नातेवाईकाच्या पेपरमध्ये ‘बदल’ केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर संबंधिताची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
प्रकरण उघडकीस येताच ‘त्या’ संचालकाची तडकाफडकी बदली केल्याने इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर मुक्त विद्यापीठाने नियमित व पूर्णवेळ पीएचडी अभ्यासक्रम सुरू केला. एका संचालकाने नातेवाईकाच्या प्रवेश परीक्षेतील पेपरमध्ये बदल केला. वास्तविक पेपरमध्ये हस्तक्षेप करण्याचा संबंधित संचालकाला काहीही अधिकार नव्हता. मात्र त्यासाठी इतर अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. त्यामुळे परीक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (प्रतिनिधी)
चौकशी समितीच्या माध्यमातून सत्य समोर येईल. प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल.
- डॉ. माणिक साळुंखे,
कुलगुरू, मुक्त विद्यापीठ