मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रकिया जाहीर

By Admin | Updated: July 13, 2016 03:29 IST2016-07-13T03:29:44+5:302016-07-13T03:29:44+5:30

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला २१ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

Open University admission process | मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रकिया जाहीर

मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रकिया जाहीर

मुंबई : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर आणि विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला २१ जुलैपासून सुरुवात होणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशाची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, म्हणून विविध ठिकाणी अभ्यास केंद्रातूनही माहिती दिली जाणार आहे. पदवी, पदव्युत्तरच्या ज्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे निकाल मिळालेले नाहीत,
त्यांनी पुढील वर्षासाठी कायम नोंदणी क्रमांकाचा वापर करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले आहे. साळुंखे म्हणाले की,
मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठीचे नियमित प्रवेश हे २१ जुलै ते ३१ आॅगस्टदरम्यान आॅनलाइन नोंदणी करून घेता येतील. तर विलंब शुल्कासह १ ते १५ सप्टेंबर आणि अतिविलंब शुल्कासह
१६ ते ३० सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी असेल. (प्रतिनिधी)

Web Title: Open University admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.