शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
4
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
5
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
6
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
7
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
8
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
9
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
10
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
11
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
12
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
14
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
15
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
16
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
17
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
18
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
19
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
20
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?

उजनी धरणातील उघडी पुरातन मंदिरे पुन्हा पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:53 IST

उजनी भरले ९३ टक्के; ब्रिटिशकालीन पाचपूल पुन्हा पाण्याखाली गडप 

ठळक मुद्देपुरातन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांनी उजनी धरण परिसरात गर्दी केली होतीपोमलवाडी-केत्तूर परिसरात असलेला ब्रिटिशकालीन पाचपूल, पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर, वांगी येथील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ या मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर पडले होतेपावसामुळे उपयुक्त साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाण्याबाहेर पडलेली सर्व पुरातन अवशेष पुन्हा पाण्याखाली बुडाली

 करमाळा : तब्बल चार महिने मृत साठ्यात असलेले उजनी धरण गत सप्ताहात उपयुक्त पाणीसाठ्यात आल्याने पाण्याबाहेर उघडे पडलेले पुरातन पळसदेवाचे मंदिर, इनामदाराचा वाडा, ब्रिटिशकालीन पाचपूल पुन्हा पाण्याखाली गडप झाले आहेत.

गतवर्षी उजनी धरण ११० टक्के भरले, पण सर्वदूर कमी पर्जन्यमान झाल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वारंवार सोडण्यात आल्याने यंदा उजनी धरणातील पाणीपातळी वजा ५९ पर्यंत जाऊन पोहोचली होती. उजनी धरण निर्मितीवेळी तालुक्यातील वांगी, चिखलठाण, कुगाव, कंदर, पारेवाडी, सांगवी, ढोकरी, टाकळी, कोंढारचिंचोली, सोगाव, कात्रज, खातगाव या गावांचे पुनर्वसन झाले. दरम्यान, उठलेल्या गावातील पुरातन अवशेष त्यावेळी पाण्यात गडप झाले.

उजनी धरणातील पाणी यंदा एप्रिलमध्ये मृतपातळीमध्ये गेले. यामुळे पाण्यात लपलेली पुरातन अवशेष बाहेर डोकावू लागली. त्यामध्ये कुगावच्या जुन्या गावठाणातील इनामदारांच्या वाड्याचा समावेश होता. या इनामदारांच्या वाड्यात तरुणाईला वेड लावणाºया नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. पोमलवाडी-केत्तूर परिसरात असलेला ब्रिटिशकालीन पाचपूल, पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर, वांगी येथील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ या मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर पडले होते. 

पुरातन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांनी उजनी धरण परिसरात गर्दी केली होती. गेल्या महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात व त्यानंतर तीन दिवसांत पुणे परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने पुणे भागातील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येऊन धरण मायनसमधून प्लसमध्ये आले. गेल्या चार दिवसांत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे उपयुक्त साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाण्याबाहेर पडलेली सर्व पुरातन अवशेष पुन्हा पाण्याखाली बुडाली आहेत.

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा झाल्याने व धरणात श्ांभर टक्के पाणीसाठा होणार असल्याने पुनर्वसित शेतकºयांतून आनंद व्यक्त होत असून, धरण व नदीपात्रात पाणी वाढल्याने पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेऊ लागले आहेत. प्रा. शिवाजीराव बंडगर,अध्यक्ष, उजनी धरण पुनर्वसन संघर्ष समिती

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकfloodपूर