शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस वेळेवर आला तरच मुगाची पेरणी!

By admin | Updated: June 11, 2016 02:48 IST

सप्टेंबर महिन्यात मुगाल प्रतिक्विंटल ८,५00 दर मिळणार; केंद्रीय कृषी विपणन केंद्राचे भाकीत.

अकोला: वेळेवर पाऊस न आल्याने मागील दहा वर्षांपासून मुगाचे उत्पादन कमी झाले आहे. यावर्षीही जून महिन्याचे दहा दिवस संपले तरी पाऊस नसल्याने मुगाच्या पेरणीबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे; परंतु कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी व केंद्रीय कृषी विपणन केंद्राने येत्या सप्टेंबर महिन्यात मुगाला आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे.मूग हे कोरवाहू पीक असल्याने जून ते जूलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पेरणी केली जाते. पेरणीनंतरही पिकाच्या वाढीनुसार पावसाची गरज असते; परंतु मागील दहा वर्षांत अनेकदा वेळेवर पाऊस आला नाही आणि पेरणीनंतर खंड पडल्याने मुगाचे उत्पादन घटले आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी मुगाचे नियोजन केले; पण पेरणीलायक पावसाचा पत्ता नसल्याने मुगाच्या पेरणीबाबत याही वर्षी शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. महाराष्ट्र हे मुगाचे प्रमुख उत्पादक राज्य असून, अकोला, लातूर, अमरावती आणि जळगाव हे राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. मुगाचे उत्पादन कमी झाल्याने अलीकडे त्याचे दर नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले आहेत. या सर्व परिस्थितीचा व बाजारपेठेचा आढावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग तसेच राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था, कृषी विपणन केंद्राच्या संशोधन चमूने घेतला आहे. या चमूने लातूर बाजारपठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील मुगाच्या मासिक सरासरी किमतीचे पृथक्करण केले आहे. त्यांनी केलेला अभ्यास व निष्कर्षानुसार, बाजारपेठेतील सद्य:स्थिती कायम राहिल्यास सामान्य हवामानात, वेगवेगळ्य़ा प्रतीनुसार मुगाचा सप्टेंबर २0१६ या महिन्यात सरासरी दर आठ ते साड हजार रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता आहे.