जगण्याला फक्त आकार द्यायचा असतो
By Admin | Updated: August 22, 2014 23:54 IST2014-08-22T23:54:44+5:302014-08-22T23:54:44+5:30
‘ज्योतिष अभ्यास कठीण आहे; पण सांगणो सोपे आहे. ग्रह बोलत असतात, तसेच आपण जगत असतो. फक्त त्या जगण्याला आकार द्यायचा असतो,’

जगण्याला फक्त आकार द्यायचा असतो
पुणो : ‘‘ज्योतिष अभ्यास कठीण आहे; पण सांगणो सोपे आहे. ग्रह बोलत असतात, तसेच आपण जगत असतो. फक्त त्या जगण्याला आकार द्यायचा असतो,’’ असे मत ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. जयश्री बेलसरे यांनी व्यक्त केले.
भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाच्या वतीने आयोजित 12 व्या दोन दिवसीय ज्योतिष अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी अधिवेशनाचे अध्यक्ष ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. वासुदेव जोशी, स्वागताध्यक्ष डॉ. सुनंदा राठी, पुष्पलता शेवाळे आदी उपस्थित होते.
या वेळी अनिल सुलाखे व आशा सुलाखे या दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. अधिवेशनाच्या दुस:या दिवसाचे विशेष आकर्षण ‘ग्रहांकित’च्या 4क्क्व्या अंकाचे प्रकाशन होते. प्रा. आदिनाथ साळवी यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. तसेच या दिवसभरात स्वरज्योतिष, टॅरो, जुडवा संतती, नाडी ज्योतिष, मुद्राज्योतिष, स्त्रीजातक, संतान सौख्य, वैश्विक ज्योतिष, संगीत आणि ज्योतिष अशा विविध विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
बेलसरे म्हणाल्या, ‘‘या अधिवेशनामागे खूप तपश्चर्या आहे. ज्या वेळी मी ज्योतिष क्षेत्रत आले, त्या वेळी मोजक्याच 3-4 महिला ज्योतिषी होत्या. मात्र, आज 75 टक्के महिला व्यासपीठावर दिसत आहेत. ही खरोखर कौतुकाची बाब आहे. पुस्तक लिहिणो हीदेखील एका तपाची तपश्चर्या असते आणि जेव्हा दोन तपे पूर्ण होतात तेव्हा स्वत:च्या डोक्यातून काहीतरी उतरते.’’
संयोजक चंद्रकांत शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)