...तरच समस्या सुटू शकतील!
By Admin | Updated: June 27, 2015 02:03 IST2015-06-27T02:03:47+5:302015-06-27T02:03:47+5:30
राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. केवळ सत्ता बदलून समस्या मिटणार नाहीत तर, सत्ताधाऱ्यांना जेव्हा राज्यातील माणसे

...तरच समस्या सुटू शकतील!
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. केवळ सत्ता बदलून समस्या मिटणार नाहीत तर, सत्ताधाऱ्यांना जेव्हा राज्यातील माणसे माझी आहेत, त्यांच्या समस्या सोडविणे माझे कर्तव्य आहे असे वाटू लागेल तेव्हाच समस्या सुटू शकतील, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले.
राज ठाकरे हे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तेथील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मंत्री येऊन केवळ इमारतीची उद्घाटने करीत सुटले आहेत; पण येथे सुविधा आहेत कुठे? कोट्यवधीची औषध खरेदी करून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारचा यंत्रणेवर धाक राहिला नसल्याने रुग्णालयांची अवस्था बिकट बनली आहे.