...तरच मुंबईतील घराच्या किंमती घटतील - प्रवीण दीक्षित
By Admin | Updated: December 27, 2014 18:44 IST2014-12-27T18:17:46+5:302014-12-27T18:44:01+5:30
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार रोखला तर मुंबईतील घराच्या किंमती प्रति स्क्वेअरफुटामागे ५०० रुपयांनी कमी होतील असे विधान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले आहे.

...तरच मुंबईतील घराच्या किंमती घटतील - प्रवीण दीक्षित
>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २७ - मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार रोखला तर मुंबईतील घराच्या किंमती प्रति स्क्वेअरफुटामागे ५०० रुपयांनी कमी होतील असे विधान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराविषयी एका खासदारानेच ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
पंढरपूरमधील एका व्याख्यानामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित सहभागी झाले होते. यामध्ये बोलताना दीक्षित यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाष्य केले. भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत ८४ व्या क्रमांकावर भूषणावह नाही असे परखड मतही त्यांनी मांडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचा-यांची संख्या वाढवण्याऐवजी लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.