समीर गायकवाडवर हत्येचा केवळ संशय

By Admin | Updated: October 7, 2015 02:08 IST2015-10-07T02:08:29+5:302015-10-07T02:08:29+5:30

गृह राज्यमंत्र्यांची ग्वाही; पानसरे हत्याकांडातील दोषींवर कारवाई होणारच.

The only suspect for murder on Sameer Gaikwad | समीर गायकवाडवर हत्येचा केवळ संशय

समीर गायकवाडवर हत्येचा केवळ संशय

अकोला : कॉ. गोविंद पानसरे हत्याकाडांतील संशयित आरोपी समीर गायकवाड याला केवळ मोबाइलवरील संभाषणाच्या संशयावरून अटक केली असल्याची माहिती, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी येथे दिली. दोषी आढळल्यास गायकवाडसह इतर दोषींवरही कठोर कारवाई केली जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कॉ. पानसरे हत्याप्रकरणी संशयाची सुई 'सनातन'कडे फिरत असल्याने या संघटनेवर बंदी आणण्याबाबत विचार सुरू आहे काय, असा प्रश्न येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, समीर गायकवाड याला केवळ संशयावरून अटक झाली आहे. मोबाइलवरील संभाषण हा पुरावा होऊ शकत नाही. प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यात दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The only suspect for murder on Sameer Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.