मंत्रिमंडळात स्थान दिले तरच भाजपासोबत-मेटे
By Admin | Updated: November 25, 2014 02:00 IST2014-11-25T02:00:12+5:302014-11-25T02:00:12+5:30
आगामी मंत्निमंडळ विस्तारात शिवसंग्राम संघटनेला हिस्सा दिला तरच भविष्यात आगामी सर्व निवडणुका भाजपासोबत लढू अन्यथा ‘भारतीय संग्राम परिषद’ आहेच,

मंत्रिमंडळात स्थान दिले तरच भाजपासोबत-मेटे
घोडबंदर : आगामी मंत्निमंडळ विस्तारात शिवसंग्राम संघटनेला हिस्सा दिला तरच भविष्यात आगामी सर्व निवडणुका भाजपासोबत लढू अन्यथा ‘भारतीय संग्राम परिषद’ आहेच, असा इशारा शिवसंग्रामचे संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी येथे दिला़ तसेच मराठा आणि मुस्लिमांच्या आरक्षणाच्या बाबतीत राज्य शासनाने जर आठवडाभरात निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला़ शिवसंग्राम संघटनेच्या मेळाव्यानिमित्त ठाण्यात आले असतांना ते पत्नकारांशी बोलत होते.
या वेळी ते म्हणलो की, मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाविरोधात सरकार गप्प बसले तर शिवसंग्राम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल़ तसेचविधानपरिषदेच्या आमदारकीच्या निलंबनानंतर पुन्हा त्याच जागी निवडून येण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मराठा व मुस्लीम समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात तग धरू शकले नाही. मात्न राणो समितीने दिलेल्या अहवालाच्या बाबतीत कुठल्याही त्नुटी नसल्याचे स्पष्ट करून एकप्रकारे शिक्षणमंत्नी विनोद तावडे यांचा दावा मेटे यांनी खोडून काढला.
तसेच शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचा भूमिपूजन समारंभ 15 फेब्रुवारी 2क्15 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्याला वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, ठाणो शहर
अध्यक्ष रमेश आंब्रे, राज्यातील
इतर पदाधिकारी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)