शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात 'डावे' फक्त नावाला, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 15:01 IST

देशात 'डावे' फक्त नावाला उरले असून काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा खरमरीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला

मुंबई : देशात 'डावे' फक्त नावाला उरले असून काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा खरमरीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमिवर बोलताना फडणवीसांनी डाव्या संघटनांना आणि कॉंग्रेसला चिमटे काढले.  मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान फडणवीस बोलत होते. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना त्यांनी देशातून डावे हद्दपार झाले आहेत. ते केवळ नावालाच उरले आहेत. आता पूर्वेकडील राज्यातही लाल सूर्य मावळला असल्याची टीका त्यांनी केली. तसंच, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत असा टोला फडणवीसांनी लगावला. 'आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान असल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवला आहे, त्यांनी भाजपवर विश्वास दाखविल्यानेच आम्ही ही मजल मारू शकलो' असं फडणवीस म्हणाले. मोदींचा विकासाचा मंत्र आणि अमित शहा यांचं संघटन कौशल्य यामुळेच हा विजय संपादन झाल्याचं सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. यावेळी बोलताना फडणवीसांनी, हा विजय केवळ ट्रेलर आहे,  पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मोदींवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. कर्नाटकात आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाच बहुमताने सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला. पूर्वेकडील राज्यात भाजपच्या विजयाचे शिल्पकार असलेल्या सुनील देवधर यांचंही फडणवीस यांनी कौतुक केलं. देवधर यांनी दोन वर्ष त्रिपुरात संघर्ष केला. त्याचंच हे फळ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो- मुख्यमंत्री आज पार पडलेल्या नदी संवर्धन संकल्प कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेले नाहीत.  त्यावर प्रतिक्रिया देताना, मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो. आरोप करणारे लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, अशांना काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. 

  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस