सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी
By Admin | Updated: July 25, 2014 01:30 IST2014-07-25T01:30:22+5:302014-07-25T01:30:22+5:30
सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी होईल़ पक्षाच्या आत्मसन्मानाशी तडजोड करून आघाडी होणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी ठणकावून सांगितले.

सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी
पुणो : सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी होईल़ पक्षाच्या आत्मसन्मानाशी तडजोड करून आघाडी होणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी ठणकावून सांगितले. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसची 144 जागांची मागणी कदापिही मान्य करणार नाही. कार्यकत्र्यानी 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे पश्चिम महाराष्ट्र विभागाचा संकल्प मेळावा गुरुवारी पुण्यात झाला़ या वेळी आघाडी करू नये, असा बहुतांश जिल्हाध्यक्षांचा सूर होता. मेळाव्याला राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, स्वराज वाल्मीकी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित होत़े
मुख्यमंत्री म्हणाले, भाजपाने मूळ प्रश्नांना बगल देऊन नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून लोकांना भुरळ पाडली आहे. देशाने गेल्या 1क् वर्षात मोठी प्रगती केली़ आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आह़े महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेर्पयत पोहोचविणार आह़े आजही महाराष्ट्र सर्व बाबतींत अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आह़े दुष्काळात शासन ताकदीने शेतक:यांच्या मागे उभा राहिला़, असे ते म्हणाले.
ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी कॉँग्रेसने 144 जागांची मागणी केली आह़े आपली ताकद वाढल्याचे ते सांगत आहेत. मात्र, आमच्या भरवशावरच शक्ती वाढली़ मागील लोकसभेच्या वेळी कॉँग्रेसने 26पैकी 17 जागा जिंकल्या होत्या़ विधानसभेतही आमच्या 1क् जागा वाढल्या तर त्यांच्या 12 जागा कमी झाल्या़ जागावाटप करताना मागील कामगिरीचा विचार केला पाहिज़े त्यांची मागणी आम्ही कदापिही मान्य करणार नाही़ कार्यकत्र्यानी 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवायला हवी.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 8 ते 9 महिने घरोघरी जाऊन वेगळा प्रचार करीत होत़े आपल्यातले मतभेद विसरून सर्वानी काँग्रेसबरोबर राहिले पाहिज़े ब:याच गोष्टी हायकमांडवर सोडून चालणार नाही़ काही निर्णय आपण घेतले पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकत्र्याचा विचार ऐकला़ विदर्भ, मराठवाडा, खानदेशमधील कार्यकत्र्याचा विचार ऐकून घेतल्यानंतर निर्णय होईल़ पण जो काही निर्णय घ्यायचा तो 15 - 2क् दिवसांत घेतला पाहिजे.