शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

केवळ पदवीधर, शिक्षक मतदारसंघच का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 5:29 AM

बदलत्या काळानुसार आता केवळ पदवीधर, शिक्षक मतदारसंघ न ठेवता, समाजातील इतर शिक्षित व अल्पभूधारक शेतकऱ्यांसारख्या घटकांचे मतदारसंघ तयार करण्याची गरज आहे.

-  हेरंब कुलकर्णीबदलत्या काळानुसार आता केवळ पदवीधर, शिक्षक मतदारसंघ न ठेवता, समाजातील इतर शिक्षित व अल्पभूधारक शेतकऱ्यांसारख्या घटकांचे मतदारसंघ तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या जागा कमी कराव्या लागतील. या निवडणुकीत अनेक गैरप्रकार होतात, ते टाळण्यासाठी व दबाव गट तयार करण्यासाठी जनसंघटनांनाच पुढाकार घ्यावा लागेल.विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले आहेत. त्यात पैशांचा वापर आणि पदवीधर व शिक्षकांच्या मतदारसंघात राजकीय कार्यकर्तेच आमदार झाल्यामुळे हे मतदारसंघ असावेत का? यावर चर्चा सुरू झाली आहे. काही जण तर विधान परिषदेचीच गरज काय, असे विचारत आहेत. निवडणूक सुधारणा समितीनेही विधान परिषद नसावी, अशीच भूमिका मांडली आहे.विधान परिषद रद्द करण्यासाठी कोणताच पक्ष तयार होणार नाही. कारण असंतुष्ट नेत्यांची सोय लावण्यासाठी तब्बल ७८ जागा मिळतात. विधान परिषदेची तिकिटे धनदांडग्या उमेदवारांना विकून पक्षनिधी व व्यक्तिगत पैसे मिळतात. त्यामुळे व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जनसंघटनांनाच पुढाकार घ्यावा लागेल. आमदारांचे मानधन, पेन्शन हा सगळा खर्च जनतेसमोर मांडून जनजागृती करावी लागेल. समाजातील विचारी वर्गाला स्थान मिळावे, म्हणून या सभागृहात एकूण २६ जागा आहेत. त्यात १२ जागा कलावंत, विचारवंत, खेळाडू व प्रत्येकी ७ पदवीधर आणि शिक्षक आमदार अशी विभागणी आहे. १२ जागांवर राजकीय नियुक्त्या झाल्याने त्यावर अनेकदा टीका झाली. तो आता चर्चेचाही विषय राहिला नाही, अशी स्थिती आहे. पूर्वी अराजकीय व्यक्ती पदवीधर व शिक्षक आमदार व्हायचे. मात्र, मागील काही निवडणुकींपासून त्यात सरळसरळ राजकीय पक्ष उतरले. किमान शिक्षक मतदारसंघात शिक्षक उमेदवार असावा, एवढी सामान्य अपेक्षाही राजकीय पक्ष आज पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे या २६ जागा जर राजकीय कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठीच असतील, तर मग हे सभागृह तरी कशासाठी ठेवले आहे? असा उपस्थित केलेला प्रश्न एकदम योग्य वाटतो.आज विधान परिषदमध्ये बहुसंख्य आमदार पदवीधर असताना आणि अगदी ग्रामीण भागातही पदवीधर मतदारांची संख्या वाढलेली असताना, वेगळे पदवीधर आमदार आवश्यक आहेत का? पदवीधर वर्गाचे प्रतिबिंब मोठ्या प्रमाणात उमटल्याने, या मतदारसंघाचे औचित्य संपले आहे. त्यामुळे या सात जागा रद्द करून त्या भरण्याचा स्वतंत्र विचार करण्याची गरज आहे.तोच प्रश्न काही जण शिक्षक मतदारसंघाबाबतही विचारतात. पूर्वी शिक्षक हा एकच संघटित वर्ग होता. त्यामुळे त्याची दखल घेतली गेली. त्यात पुन्हा शिक्षक वर्गाने समाजाचे नेतृत्व करावे, असेही अनुस्यूत होते. आज डॉक्टर, ग्रामसेवक, व्यापारी, शेतकरी असे वेगवेगळे वर्ग मोठ्या संख्येने संघटित झाले आहेत. आता समाजाचे नेतृत्व केवळ शिक्षक नाही, तर अनेक समाज घटक करत आहेत. वकील, व्यावसायिक, पत्रकार प्रभावीपणे मते मांडत असतात. तेव्हा एकट्या शिक्षक वर्गालाच सात जागा कशासाठी? या जागा विभागून वेगवेगळ्या वर्गाला द्या, असा मुद्दा अनेक जण मांडत आहेत. शिक्षकांत प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन व तंत्रशिक्षण असे वर्गीकरण करून त्यांनाही जागा द्यावी. त्याचबरोबर, ग्रामसेवक तलाठी, वैद्यकीय, अंगणवाडी कर्मचारी असे थेट गावपातळीवर काम करणारे प्रतिनिधी असावेत.अल्पभूधारक शेतकरी वर्गालाही जागा असावी. हे सारे मतदारसंघ फिरते ठेवले, तर त्यातून सर्व भागांतील लोकांना न्याय मिळेल. विधान परिषदेच्या १२ जागा पत्रकार, लेखक, कलावंत यांनाच दिल्या, तर तो वर्गही सभागृहात येऊ शकेल. शिक्षक आमदार फक्त वेतन व सुट्टी एवढेच मुद्दे मांडतात. ते केवळ शिक्षकांना खूश करण्याचा प्रयत्न करतात, असे आढळते. तरीही या जागा रद्द कराव्यात, असे म्हणणार नाही. कारण शिक्षणातील प्रश्न यातून सोडविले जाऊ शकतात. शिक्षकांसोबत पालकही मतदार केले पाहिजेत. शाळेतील पालक संघाच्या अध्यक्षाला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. या निवडणुकीत पैठणी, पैसे वाटणे हे गैरप्रकार घडले. त्याबाबत मी स्वत: निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार नाही. राज्यातील साडेचार लाख प्राथमिक शिक्षक, विना अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमातील शिक्षक व पालकांनाही मतदार केले, तर मतदारांची संख्या वाढेल. मग मतदार विकत घेण्याचे प्रमाण कमी होईल. शिक्षणातून नैतिकता उंचावत नाही, हेच पुन्हा निवडणुकीतून अधोरेखित झाले. ती उंचावायची कशी, हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.(लेखक शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)

टॅग्स :Electionनिवडणूक