शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोठारी कंपाऊंडला केवळ तारीख पे तारीख, पालिका बजावतेय केवळ नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:42 IST

एकीकडे शहरातील लेडीज बार, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लर आदींवर पालिकेने हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु दुसरीकडे कोठारी कंपाऊंडमधील गाळेधारकांना मात्र तारीख पे तारीख दिली जात आहे.

ठाणे - एकीकडे शहरातील लेडीज बार, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लर आदींवर पालिकेने हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु दुसरीकडे कोठारी कंपाऊंडमधील गाळेधारकांना मात्र तारीख पे तारीख दिली जात आहे. नोटिसा बजावण्यापलिकडे पालिकेने अद्याप येथील बांधकामांवर हातोडा टाकलेला नाही. आता पुन्हा एका आठवड्याची मुदत दिली असून, केवळ तारीख पे तारीखचाच खेळ सुरू आहे. त्यात येत्या 13 ऑक्टोबरला पुन्हा महासभा लावण्यात आली आहे. परंतु कारवाई झाली नाही तर महासभा होणार का? असा प्रश्न मात्र राहणारच आहे.कोठारी कंपाऊंडच्या मुद्यावरुन मागील महिन्यात महापौरांनी महासभा तहकूब केली होती. त्यानंतर आता पुन्हा येत्या 13 ऑक्टोबर रोजी तीच महासभा लावण्यात आली आहे. परंतु यावेळेस महापौर आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान शहरातील इतर ठिकाणी कारवाई करताना पालिकेने नोटीस बजावली नव्हती. हा मुद्दा महासभेत देखील गाजला होता. त्यानंतरही पालिकेने कोठारी कंपाऊंडमधील गाळेधारकांना नोटीस बजावण्याचे काम केले आहे.दुसरीकडे तसेच यापूर्वी कारवाई होऊनही पुन्हा एकदा सुरू झालेल्या शहरातील अनधिकृत लेडीज बारवर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. परंतु या खेपेला देखील पालिकेने संबंधिताना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली नाही. थेट कारवाई केली. याचाच अर्थ एकाला एक न्याय आणि दुस-या एक न्याय अशी भूमिका पालिकेकडून घेत जात असल्याचा आरोप आता या मंडळींनी केला आहे. आतापर्यंत शहरातील सहा बारवर महापालिकेने कारवाई केली आहे. अनधिकृत लेडीज बारवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेले दिली आहे. या कारवाईपूर्वी कोठारी कंपाऊंडमधील सुरू असलेल्या सर्वच अनधिकृत हुक्का पार्लर, पबला महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर कोठारी कंपाऊंडच्या निमित्ताने महासभेत उठलेले वादळ शांत करण्यासाठी सर्वसाधारण सभेनंतर पालिका आयुक्त आणि राजकीय पदाधिका-यांची एक महत्वाची बैठक घेण्यात आली होती.या बैठकीनंतर प्रथम 20 सप्टेंबर रोजी 26 व्यावसायिकांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुस-यांदा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस 100 हून अधिक व्यावसायिकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोठारी कंपाउंड मधील व्यावसायिकांनी महापालिकेच्या या कारवाईलाच आव्हान दिले होते. त्यानंतरही पालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई न करता पुन्हा एकदा नव्याने नोटीस दिल्या आहेत. उपायुक्त स्तरावरील तसेच फायर ब्रिगेडच्या नोटिसा असून, पुन्हा एकदा या व्यावसायिकांना त्यांच्या बचावासाठी कालावधी देण्यात आला आहे. नोटीस बजावल्यानंतर किती व्यावसायिकांनी आपले म्हणणे मांडले आहे, याची माहितीही सहाय्यक आयुक्तांकडे उपलब्ध नाही. कोठारी कंपाउंड संदर्भातील कोणत्याही प्रकारचा निर्णय माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीच्या माध्यमातून घेण्यात येत नसून पालिका मुख्यालयातूनच कार्यवाही करण्यात येत आहे.इतर अनधिकृत बार आणि लॉजवर नोटीस न देता कारवाई करणा-या महापालिकेने कोठारी कंपाउंडमधील व्यावसायिकांना केवळ नोटीस देण्याचा फार्स केला आहे. कोठारी कंपाउंडवर कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई होईल, असे आश्वासन महापौरांना सभागृहात देणारे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल कोठारी कंपाउंडवर कधी कारवाई करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे